esakal | Amul Macho : विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या जाहिरातीवरुन वाद का?
sakal

बोलून बातमी शोधा

विकी कौशल आणि रश्मिकाची 'माचो' जाहिरात, नेटकरी करतायेत ट्रोल

विकी कौशल आणि रश्मिकाची 'माचो' जाहिरात, नेटकरी करतायेत ट्रोल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

-अशोक व्यवहारे

रश्मिका मंदना आणि विकी कौशल यांनी 'अमूल माचो'साठी जाहिरात शूट केली आहे. पण सध्या ही नवी जाहिरात सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलाय. याचं कारणही तितकंच 'माचो' आहे.

होझरी प्रा. कंपनीच्या नव्या जाहिरातीमुळे वादाला तोंड फुटलंय. काही आठवड्यांपूर्वी अभिनेता वरूण धवन 'लक्स कोझी'च्या जाहिरातीवरून वादात सापडला होता. त्या जाहिरातीवरून दोन कंपन्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. 'लक्स कोझी'वर खटला भरणारी कंपनी 'अमूल माचो' आहे, जी पुरुषांचे अंडरगारमेंट्स विकते.

 Vicky Kaushal and Rashmika Mandana's Amul Macho ad Troll

Vicky Kaushal and Rashmika Mandana's Amul Macho ad Troll

जाहिरात खरचं 'माचो' आहे का?

या जाहिरातीत रश्मिका योगा ट्रेनरच्या भूमिकेत असून विकी तिचा विद्यार्थी दाखवलाय. योगा क्लास सुरू असताना एका आसनादरम्यान रश्मिकाला विकीची अंडरवेअर दिसते. त्यावर 'माचो' असं लिहिलेलं असतं. रश्मिकाचं लक्ष आपल्या अंडरवेअरकडे असल्याचं विकीलाही समजतं, मात्र तो पुन्हा डोळे मिटून घेतो.

यानंतर पुढच्या दिवशी होणाऱ्या योगा क्लाससाठी रश्मिका आधीच पोहोचलेली असते. आणि विकीने घातलेली अंडरवेअर पुन्हा दिसावी, यासाठी ती शक्कल लढवते. विकी योगासनं करण्यासाठी वापरत असलेली मॅट रश्मिका उंचावर ठेवते. ती काढण्यासाठी विकी हात वर करतो, आणि टी-शर्ट वरती झाल्याने रश्मिकाला पुन्हा त्याची अंडरवेअर दिसते. रश्मिनेच ही आयडीया केल्याचं विकीलाही समजतं, आणि दोघांमध्येही केमिस्ट्री फुलते. आता या जाहिरातीवरून नेटकऱ्यांनी दोघांवर टीका केली आहे.

loading image
go to top