'Big Boss 16 ची विनर प्रियंका चाहर', असं का म्हटलं जातंय? 'या' 5 गोष्टींनी अभिनेत्रीचं पारडं जड...

बिग बॉस १६ हा शो जेव्हापासून सुरु झाला आहे तेव्हापासून प्रियंका चाहर चौधरी विषयी सोशल मीडियावर खूप सकारात्मक प्रतिक्रिया लोक देताना दिसत आहेत.
Wiil Priyanka Chahar Chaudhari become winner of Big boss 16? Here are 5 Reasons
Wiil Priyanka Chahar Chaudhari become winner of Big boss 16? Here are 5 ReasonsGoogle

Big Boss 16 Winner: सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस १६ हळूहळू खूपच रंजक होत चाललेला आहे. भले घरातील काही सदस्यांनी अद्याप आपलं खरं रुप सर्वांसमोर आणलं नाही, पण शो मध्ये सुरु असलेले वाद, रोमान्स आणि भरपूर मसाला प्रेक्षकांचे मात्र मनोरंजन करताना दिसत आहेत. या सगळयामध्ये आता अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरीचं मात्र भलतंच कोडकौतूक होताना दिसत आहे. गेल्या भागात प्रियंकाचं एवढं कौतूक का होतंय हे आपल्या समोर आलं होतं.

तिच्या एका निर्णयानं घरातील इतर सदस्यांना तर चांगली शिकवण दिलीच पण बिग बॉसला देखील तिचं फॅन केलं. असं फार कमी वेळा घडतं जेव्हा बिग बॉस एखाद्या सदस्याची प्रशंसा करतो. प्रियंकाचे चाहते देखील तिचं कौतूक करताना म्हणत आहेत की, प्रियंका जर असेच बेधडक निर्णय घेत राहिली तर या सिझनची विनर बनण्यापासून तिला कोणीच रोखू शकत नाही. चला,जाणून घेऊया ती पाच कारणं ज्यामुळे प्रियंका बिग बॉस ची ट्रॉफी आपल्या नावावर करु शकते.(Wiil Priyanka Chahar Chaudhari become winner of Big boss 16? Here are 5 Reasons)

Wiil Priyanka Chahar Chaudhari become winner of Big boss 16? Here are 5 Reasons
Sajid Khan: अभिनेत्रीनं साजिद विरोधात थेट व्हिडीओच पोस्ट केलाय, आरोप ऐकाल तर कानावरच हात ठेवाल...

१.जर प्रियंका चाहर चौधरीचा बिग बॉसच्या घरातील गेम पाहिलात तर तिला योग्य-अयोग्य यातला फरक अचूक कळतोय हे लक्षात येतंय. आणि हेच कारण आहे की ती घरातल्या कटकारस्थानापासून स्वतःला लांब ठेवताना दिसली. इतरांप्रमाणे ती उगाचच कोणाच्या समर्थनाची वाट पाहत नाही. आता हे जगजाहिर आहे की बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनपासून वाचण्यासाठी ग्रुप बनवणं गरजेचं आहे,पण प्रियंका यापासनं लांब राहतेय. कोणाचा पाठिंबा मिळाला नाही तर आपण घराच्या बाहेर जायला तयार आहोत असं तिचं बिनधास्त मत आहे. याबाबतीत कोणतीच भीती तिच्या मनात नाहीय.

'उडारियां' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली प्रियंका चाहर चौधरीने आतापर्यंत कोणत्याही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दिलेला नाही, ती नेहमी योग्य गोष्टीला पाठिंबा देताना दिसली. जेव्हा घरातील सदस्यांनी मान्या सिंगवर सिंक साफ करण्यासाठी निशाणा साधला होता तेव्हा प्रियंकाच होती जिनं तिची बाजू घेतली होती.

2. प्रियंका टास्कमध्येही आपले १०० टक्के देते,मग त्यासाठी कोणालाही भिडावं लागलं तर ती मागेपुढे पाहत नाही. जेव्हा शिव ठाकरे आणि गौतम विज यांच्यामध्ये कॅप्टन बनण्यावरनं टास्क झाला होता,तेव्हा प्रियंकाची निमृत कौर अहलूवालियासोबत बाचाबाची देखील झाली होती,पण ती मागे हटली नाही. जेव्हा बिग बॉसने अब्दूवर व्हिडीओ बनवण्याचा टास्क दिला होता तेव्हा प्रियंकानं घेतलेली मेहनत सगळ्यांनी पाहिली.

Wiil Priyanka Chahar Chaudhari become winner of Big boss 16? Here are 5 Reasons
KBC14: चूक भोवली... नाहीतर सिझनचा पहिला विजेता बनला असता शाश्वत गोयल, काय घडलं नेमकं?

३. प्रियंकानं एक असा बोल्ड निर्णयही घेतला ज्यामुळे तिनं सगळ्यांचे मन जिंकले. अगदी बिग बॉसनेही तिची त्यासाठी प्रशंसा केली. तिनं घरातल्या सदस्यांना चांगला धडा शिकवलाय जे ते या सिझनमध्ये तरी विसरु शकणार नाही. प्रियंकाला प्रत्येकाला रुम निवडून देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

प्रियंकानं सुरुवातीला सगळ्यांचे मत विचारले. तिनं शालीनच्या प्रकृतीचा विचार करत त्याला रुम नंबर २ मध्ये राहण्यास सांगितले, पण त्याच्यासोबत अर्चनाला शिफ्ट केलं. यासंदर्भात कोणी विचारही नव्हता केला.

ज्या रुममध्ये सृजिता,निमृत आणि टीनानं चालाखीनं कमी किराणा माल पाठवला होता, प्रियंकानं तिघींना हुशारीनं तिच रुम दिली. म्हणजे तिनं त्यांचा गेम त्यांच्यावरच पलटवला. आणि स्वतः अशा रुममध्ये गेली जिकडे जास्त किराणा माल भरुन ठेवला होता. आणि आपल्यासोबत तिनं अंकितला घेतलं कारण ते दोघे चांगले मित्र आहेत. बाकी इतर सदस्यांना म्हणजे अब्दू रोझिक,शिव ठाकरे,एमसी स्टॅन असा सगळ्यांना तिनं एकत्र राहण्यास दिलं जे एकमेकांची चांगली काळजी घेतात. प्रियंकानं अशाप्रकारे हातात आलेल्या संधीचं सोनं केलं.

४. प्रियंका चाहर जेव्हापण काही बोलते,एकदम थेट बोलते. त्यात खरेपणा असतो. ती कधीच तोंडावर एक-मागे एक असं बोलत नाही. कुचाळक्या जिथं गरजेच्या तिथेच करते. उठसुठ गॉसिपचा भाग बनत नाही. आणि जिथे गरज आहे तिथे आपला आवाज उठवते. कोणाला भिडायला देखील मागेपुढे पाहत नाही.

५. बिग बॉस सिझन १६ हा शो १ ऑक्टोबरला सुरु झाला होता. आता पंधरा दिवस होत आलेयत. पण या १५ दिवसांत प्रियंका खुप खरी वाटली. आतापर्यंत तिनं स्वतःला ती जशी आहे तसंच दाखवलं. आणि तिचं हेच वागणं प्रेक्षकांना भिडलं. अंकित गुप्तासोबतची तिची मैत्री ती मनापासून जपताना दिसते. अब्दू रोझिकसोबतही ती खूप मजामस्ती करताना दिसते.अब्दूची ती काळजीही घेताना दिसते.

म्हणूच आता पहायचं प्रियंका चाहरच्या इतक्या सगळ्या चागल्या बाजूंमुळे बिग बॉस १६ च्या ट्रॉफी पर्यंत ती पोहचू शकते की नाही की घरातला कोणी इतर सदस्य की वाइल्ड कार्ड एन्ट्रीतून घरात येणारा सदस्य तिला कांटे की टक्कर देतोय, हे सगळं येणारा काळ सांगेलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com