आमिर तिसऱ्यांदा करणार लग्न? अखेर सत्य आलं समोर.. | Aamir Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aamir khan

आमिर तिसऱ्यांदा करणार लग्न? अखेर सत्य आलं समोर..

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानचा केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या अभिनयाची चर्चा ही हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. आमिर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला, किरण रावला घटस्फोट दिला होता. त्यावरुन त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या. तो एका बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय आणि 'लाल सिंग चड्डा' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो त्याच्या लग्नाची घोषणा करणार आहे असं म्हटलं जात होतं. पण आता या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे.

आमिरने ३ जुलै रोजी पत्नी किरणसोबतच्या घटस्फोटाची बातमी जाहीर केली होती, आणि बऱ्याच दिवसांपासून आमिर आणि अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे फातिमाला त्यांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत ठरवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत, असं म्हटलं जात होतं. पण आता इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा या खोट्या असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा: रब ने बना दी जोडी! अमृता-हिमांशूची लव्हस्टोरी

आमिर आणि फातिमाचं नाव 'दंगल' चित्रपटानंतर जोडलं गेलं. फातिमाने या अफवांवर एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. "काही अनोळखी लोक, ज्यांना मी कधी भेटले देखील नाही, ते माझ्याविषयी लिहित आहेत. त्यांना तर खरं काय आहे हे देखील माहिती नाही आणि जे लोक त्यांनी लिहिलेलं वाचत आहेत, त्यांना वाटतंय की मी माणूस म्हणून अतिशय वाईट आहे. मला त्यांना सांगावसं वाटतंय की तुम्हाला जे काही विचारायचं आहे, ते मला विचारा मी नक्की उत्तरं देईन. पण लोकांनी माझ्याबद्दल काही चुकीचा विचार करू नये, असं मला वाटतं", असं ती म्हणाली.

आमिरनं १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मग नंतर शूटिंगदरम्यान आमिर आणि किरणची भेट झाली. या दोघांनी २००५ मध्ये लग्न केलं. १५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आमिर आणि किरण यांना एक मुलगा आहे.

loading image
go to top