IFFI 2023: IFFIमध्ये प्रथमच कन्नड चित्रपटाचा डंका! कांताराने जिंकला पुरस्कार तर 'पंचायत 2'ने..

54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मंगळवारी गोव्यात सांगता झाली.
Complete list of winners at IFFI 2023
Complete list of winners at IFFI 2023Esakal

Complete list of winners at IFFI 2023: 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) मंगळवारी गोव्यात सांगता झाली. या महोत्सवात 25 फीचर चित्रपट आणि 20 नॉन फीचर चित्रपटांसह 270 आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.

28 नोव्हेंबरला या महोत्सवाचा समारोप समारंभात पार पडला. मंगळवारी संध्याकाळी पणजी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये भव्य समारोप आणि पुरस्कारांच्या घोषणेनंतर नऊ दिवस चालणारा हा महोत्सव संपला. यावेळी चित्रपट आणि OTT वेब सीरिज यांना पुरस्कार देण्यात आले.

Complete list of winners at IFFI 2023
Kantara Chapter 1 : 'कांतारा' च्या प्रिक्वेलची काय असेल स्टोरी? ऋषभ आता यावेळी....

यावेळी अब्बास अमिनीच्या 'एंडलेस बॉर्डर्स'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाला प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्काराने गौरविण्यात आले. तर 'कांतारा'साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी पुरस्कार देण्यात आला आहे. प्रथमच कन्नड चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला. तर 'पंचायत सीझन 2' ने प्रथमच सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार जिंकला. हॉलिवूडचे दिग्गज मायकेल डग्लस यांना 'सत्यजित रे' जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

Complete list of winners at IFFI 2023
Uttarkashi Tunnel Rescue: ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर बॉलिवूडमध्येही आनंदाची लहर!

राजकुमार हिरानी, ​​उत्पल बोरपुजारी, कृष्णा डीजे, दिव्या दत्ता आणि प्रोसेनजीत चॅटर्जी या पाच सदस्यीय ज्युरीने हे पुरस्कार निश्चित केला.

Complete list of winners at IFFI 2023
Gururaj Jois Passes Away: सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! 'लगान' चित्रपटातील काम अविस्मरणीय

सर्वोत्कृष्ट चित्रपट: एंडलेस बॉर्डर्स

स्पेशल ज्युरी अवॉर्ड: कांतारा चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी

सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT): पंचायत सीझन 2

सर्वोत्कृष्ट अभिनेता : पौरिया रहीमी (Pouria Rahimi Sam)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: मेलानिया थियरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: स्टेपन कोमांद्रेव

दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण : रेगर आझाद काया

FFI ICFT UNESCO गांधी पदक: ड्रिफ्ट

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार: मायकेल डग्लस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com