
Memes on Cold : 'तू अशी थरथर का कापतेस!' थंडी वाढली, नेटकऱ्यांनाही चढला जोर
Memes on Cold: देशभर थंडीचा कडाका वाढताना दिसतोय. देशाची राजधानी दिल्लीमध्ये तर सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. संबंध उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे. अशातच सकाळी उशिरा पर्यत घराच्या बाहेर नागरिक पडत नसल्याचे दिसून येत आहे. अतिशीत वाऱ्यांमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या थंडीनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या चित्रपटांमधल्या डायलॉग्ज, गाणी यांचा आधार घेऊन नेटकऱ्यांनी थंडीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळे उपाय केले आहे.
पुण्यामध्ये देखील गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. पुण्याचा पारा हा ७ अंशावर आला आहे. सोशल मीडियावर मात्र नेटकऱ्यांनी थंडीची चांगलीच खिल्ली उडवल्याचे दिसून आले आहे. कित्येकांनी जोक्स शेयर करत, त्याचे मीम्स तयार करुन नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. एकानं तर गँग्स ऑफ वासेपूरमधील मनोज वाजपेयीचा तो सीन शेयर केला आहे. त्यामध्ये तो त्याच्या मैत्रीणीला काही बोलत असतो.
नवाझुद्दीन सिद्धिकीनं देखील सेक्रेड गेम्समध्ये प्रभावी भूमिका साकारली होती. त्यातील काही डायलॉग्ज घेऊन नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.
राज्यात धुके आणि ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानाचा पारा वाढलेला दिसत आहे. आता पुन्हा तापमानात घट होत असल्याने गारठा वाढत असून विदर्भात काही ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली गेला आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढत आहे. राज्यातील काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.