Video : नृत्याच्या व्हिडिओमुळे रानू मंडल पुन्हा चर्चेत

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

सोशल मीडियामुळे एका रात्रीत चर्चेत आलेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी आवाजामुळे नव्हे तर त्यांच्या नवरात्रीमधील नृत्यामुळे. सोशल मीडियावर नृत्याचा एक व्हायरल झाला आहे.

मुंबई : सोशल मीडियामुळे एका रात्रीत चर्चेत आलेल्या रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी आवाजामुळे नव्हे तर त्यांच्या नवरात्रीमधील नृत्यामुळे. सोशल मीडियावर नृत्याचा एक व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या रानू या गाण्याऐवजी नाचताना दिसत आहे. पण, व्हिडिओमधील महिला ही रानू मंडल नसून, त्यांच्यासारखी दिसणारी महिला आहे. मात्र, हेच साधर्म्य असल्याने अनेकजण हा व्हिडिओ रानू मंडल यांचा डान्स म्हणून शेअर करण्याबरोबरच प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. सिंगर हिमेश रेशमियाच्या 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या चित्रपटासाठी त्यांनी एक गाणे गायले आहे. शिवाय, त्यांना गाण्यासाठी अनेक ऑफरही येत आहेत. रानू मंडल यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे.

आपल्या जादुई आवाजाने वेड लावणाऱ्या रानू या मूळच्या पश्चिम बंगालच्या राणाघाटमधील राहणाऱ्या आहेत. रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचे गाणे ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्याने रानू गात असेलेले लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा' हे गाणं व्हिडीओ शूट केले आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अपलोड केला. यामुळे त्या एका रात्रीत चर्चेत आल्या.

दरम्यान, रानू यांच्यासारख्या दिसणाऱ्या एक माहिलेचा नवरात्रीमधील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांना व्हिडिओमधील महिला ही रानूच असल्याचे वाटत आहे. मात्र व्हिडिओत दिसणाऱ्या रानू मंडल नाहीत हे व्यवस्थित पाहिल्यानंतर समजते. व्हायरल व्हिडिओमधील ही महिला कोण आहे? याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. पण हा आठ सेकंदांचा व्हिडिओ रानू यांच्या नावानेच शेअर केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women dance on road many says its ranu mandal video viral