वंडर वूमन'ची तलवार तळपली 

भक्ती परब
बुधवार, 7 जून 2017

मेच्या तिसऱ्या आठवड्यात शांघायमध्ये प्रदर्शित झालेला "वंडर वूमन' चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अमेरिकेसह भारतातही तो प्रदर्शित झालाय.

लेखिका-दिग्दर्शिका पॅटी जॅन्कीन्स हिचा चित्रपट असल्यामुळे उत्सुकता होती. "मॉन्स्टर'च्या यशामुळे तिच्याकडून समीक्षकांच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. तिने ही अपेक्षापूर्ती केलेली आहे. त्याचबरोबर अभिनेत्री गल गडोट हिचीही सगळीकडे चर्चा आहे.

तिने आतापर्यंतच्या सगळ्या सुपरहिरोजच्या तोडीस तोड कामगिरी केलीय, अशा शब्दांत तिचेही कौतुक होतेय. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 10 कोटींची कमाई केली होती. एवढी कमाई करणारा हा पहिला चित्रपट आहे जो एका दिग्दर्शिकेने बनवलाय.

स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आलेली ही पहिली डीसी कॉमिक फिल्म आहे. ज्यामध्ये अभिनेत्री गल गडोट मध्यवर्ती भूमिकेत आहे. चित्रपटाचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्याचबरोबर सोशल मीडियातूनही या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात येतेय. एकूणच प्रिन्स डायना म्हणजेच "वंडर वूमन'ची तलवार चांगलीच तळपली आहे. आतापर्यंत जगभरात या चित्रपटाने 1434 कोटींची कमाई केलीय. प्रेरणादायी सुपरहिरो बनलेली गल गडोट आपल्या जबरदस्त ग्रेसफूल ऍक्‍शनने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवते. एका स्त्रीने दिग्दर्शित केलेला, एका स्त्रीने अभिनित केलेला आणि स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेला चित्रपट अशी याची समीक्षकांकडून दखल घेतली जातेय. 
 
Web Title: Wonder Woman's movie