'आवाज वाढव डीजे' म्हणणाऱ्या गीतकाराची खंत, ५४ चित्रपट, १२५ गाण्यांनंतर..

५४ चित्रपट,१२५ गाणी लिहिणाऱ्या लेखक आणि गीतकार क्षितिज पटवर्धन याने एक पोस्ट लिहिली आहे.
writer kshitij patwardhan shared post he won first mirchi music award for dhurala movie songs
writer kshitij patwardhan shared post he won first mirchi music award for dhurala movie songs sakal

kshitij patwardhan : नाटक, चित्रपट, जाहिराती, कविता, गाणी अशा अनेक माध्यमात चौफेर लेखन करणाऱ्या क्षितिज पटवर्धन याने नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट बरीच वायरल देखील झाली. या पोस्टमध्ये क्षितिजने एकाच वाक्यात आपल्या स्ट्रगल विषयी बरेच काही लिहिले आहे. नुकतेच त्याला 'मिर्ची मराठी म्युझिक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्याने ही पोस्ट लिहिली आहे.

writer kshitij patwardhan shared post he won first mirchi music award for dhurala movie songs
'हंबीरराव' मधील 'या' अमराठी अभिनेत्याचं मोठं विधान.. म्हणाला,मराठीत सगळेच..

क्षितिजने अगदी कमी कालावधीमध्येच कलाविश्वामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. क्षितिजने आजवर खूप मेहनत घेतली आहे. त्याने लिहिलेली अनेक गाणी तूफान गाजली. आवाज वाढव डिजे, मन धागा धागा आणि अशी अनेक गाणी. त्याचा धुरळा चित्रपट सर्वांच्या विशेष लक्षात राहिला. याच चित्रपटातील गाण्यांसाठी क्षितिजला 'मिरची म्युझिक' पुरस्कार देण्यात आला.

क्षितिजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटदवरुन 'मिरची'च्या ट्रॉफीचा फोटो शेयर करुन लिहिले आहे की, '५४ चित्रपट, १२५ गाण्यांनंतर पहिलं मिर्ची मराठी म्युझिक पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अल्बम २०२०-२१ चित्रपट ‘धुरळा’. आता अधिकृतरित्या स्वतःला गीतकार म्हणायला हरकत नाही.” क्षितिजने बऱ्याच मेहनतीनंतर संगीत क्षेत्रामधील हा पुरस्कार पटकावला आहे. ‘धुरळा’ चित्रपटासाठी क्षितिजने उत्तम गाणी लिहिलीच शिवाय पटकथा लेखनही केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com