esakal | WWE रेसलर जाॅन सीना याने सिद्धार्थ शुक्लाला वाहिली श्रध्दांजली
sakal

बोलून बातमी शोधा

WWE रेसलर जाॅन सीना याने सिद्धार्थ शुक्लाला वाहिली श्रध्दांजली

WWE रेसलर जाॅन सीना याने सिद्धार्थ शुक्लाला वाहिली श्रध्दांजली

sakal_logo
By
अर्चना बनगे

सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली एक्झिटने अनेक बाॅलीवूड स्टार यांनी आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर श्रध्दांजली वाहिली. देशातच नाही तर जगभरात सिद्धार्थच्या मृत्यूने खळबळ उडाली. WWE रेसलर जाॅन सीना याने ही सिद्धार्थ शुक्लाचा फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर करून श्रध्दांजली वाहिली आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूमागे हृदयविकाराचं कारण असल्याचं सांगितलं जातं. पण अचानक एक्झिट घेतल्याने प्रत्येकाला धक्का बसला आहे. अभिनेता व रेसलर जाॅन सीना याने सिद्धार्थचा ब्लॅक आणि व्हाईट फोटो शेअर केला आहे.

सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता.

जाॅन सीना सोशल मिडीयावर लोकप्रिय आहेत. यांने पोस्टमध्ये अनेक बॉलीवुड कलाकारांचे फोटो शेअर केलेले आहेत. ज्यामध्ये कोणतेही कॅप्शन नाही.

loading image
go to top