Yami Gautam Article 370 Movie : यामी गौतमच्या 'आर्टिकल ३७०' वर कोणत्या देशांनी घातली बंदी? काय आहे कारण

यामीच्या आर्टिकल ३७० या चित्रपटानं (Yami Gautam Article 370 Movie news) प्रेक्षकांची पसंती मिळवली असून गल्फ कंट्रीमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Yami Gautam article 370 movie latest news
Yami Gautam article 370 movie latest newsesakal

Yami Gautam article 370 movie : बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती यामी गौतमच्या आर्टिकल ३७० नावाच्या चित्रपटाची. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना या (Yami Gautam article 370 movie news) चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रभावित केले होते. अखेर तो चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच एका बातमीनं मात्र वेगळ्याच चर्चांना उधाण येत आहे.

यामीच्या आर्टिकल ३७० चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यामी गौतमचे कौतूक केले होते. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया मेकर्ससाठी मोठी पावती होती. (Yami Gautam article 370 movie latest news) देशभरामध्ये आर्टिकल ३७० ची चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र त्यावरुन वादही समोर येत आहेत. काही देशांमध्ये या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बंदी घालण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आखाती देशांमध्ये आर्टिकल ३७० वर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Bollywood Latest news) भारतामध्ये या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे. या सगळ्यात आखाती देशांनी मात्र आर्टिकल ३७० च्या विरोधात भूमिका घेतल्यानं त्याचा मोठा फटका मेकर्सला बसणार असल्याचे दिसते आहे. खरं तर गल्फ कंट्रीमध्ये बॉलीवूडच्या चित्रपटांचा चाहतावर्गही मोठा आहे. या शिवाय साऊथच्या चित्रपटांनाही मोठा प्रतिसाद तिथे मिळतो.

आता मिळालेल्या माहितीनुसार यामी गौतम आणि प्रियामणिच्या आर्टिकल ३७० वर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट जम्मू काश्मिरला जो कलम ३७० विशेष दर्जा देण्यात आला होता तो रद्द झाल्यानंतरच्या परिस्थितीवर हा चित्रपट बेतलेला आहे. यामीचा हा चित्रपट एक पॉलिटिकल ड्रामा असून त्यातून तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Yami Gautam article 370 movie latest news
Tejaswini Pandit : 'आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज...? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता'! तेजस्विनीची सणसणीत पोस्ट

या वर्षी आखाती देशांनी भारतीय चित्रपटांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी खरं तर ऋतिक आणि दीपिकाचा फायटर नावाचा चित्रपटही युएई सोडून बाकीच्या आखाती देशांमध्ये बॅन करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com