esakal | 'मी भारी की जॅकलीन', यामीच्या प्रश्नाला माधुरीनं दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

'मी भारी की जॅकलीन', यामीच्या प्रश्नाला माधुरीनं दिलं उत्तर

'मी भारी की जॅकलीन', यामीच्या प्रश्नाला माधुरीनं दिलं उत्तर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं आणि नृत्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये माधुरीचं नाव घेतलं जातं. अजूनही ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. ती वेगवेगळ्या रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होते आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. माधुरीच्या डान्सचा जलवा त्या शो मधून दिसून येतो. अजूनही तिचा डान्स हा किती प्रभावी आणि सुंदर आहे याची कल्पना जेव्हा तिच्या बरोबर बॉलीवूडमधील इतर अभिनेत्री नृत्य करतात तेव्हा येतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये यामी गौतम, जॅकलीन फर्नांडिझ यांनी माधुरी या तिघी नृत्य करताना दिसत आहे.

यावेळी अभिनेत्री यामीनं माधुरीला एक प्रश्न विचारला तो म्हणजे माझ्यात आणि जॅकलीनमध्ये सर्वात प्रभावी कोण आहे, त्यावर माधुरीनं दिलेल्या उत्तरानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं झालं असं की, यामी आणि जॅकलीन या दोघीजणी त्यांच्या भूत पोलीस नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डान्स दिवाने 3 च्या सेटवर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माधुरीसोबत गणेश चतुर्थी सेलिब्रेशनही केले. डान्स दिवानेच्या तिसऱ्या पर्वामध्ये माधुरीसोबत धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया नावाचे परिक्षकही या शो मध्ये सहभागी झाले आहेत. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी शोमधील पाहूण्यांसोबत गंमती जंमती केल्याचे दिसून आलं आहे.

यामीनं माधुरीला जॅकलीन आणि माझ्य़ात सर्वाधिक प्रभावी कोण आहे असा प्रश्न विचारला तेव्हा माधुरीनं उत्तर दिलं. घर की मुर्गी....अशा शब्दांत तिनं यामीला उत्तर दिलं. त्य़ावेळी उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला होता. यानंतर यामीनं माधुरीला गेंदा फूल नावाच्या गाण्यावर डान्स करण्यासाठी विनंती केली. जी तिनं आनंदानं स्वीकारली आणि आपल्या डान्सनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

हेही वाचा: यामी गौतमला ईडीने बजावले समन्स

हेही वाचा: सोनाली ते यामी.. धूमधडाका नाही तर साध्या विवाहाला पसंती देणाऱ्या अभिनेत्री

loading image
go to top