'KGF 2' नंतर कधी येतोय 'KGF 3'? 'रॉकी भाई' नं दिलीय मोठी हिंट Yash | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yash- KGF Chapter 2

'KGF 2' नंतर कधी येतोय 'KGF 3'? 'रॉकी भाई' नं दिलीय मोठी हिंट

केजीएफ चॅप्टर २(KGF Chaapter2) हा सिनेमा १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर जणू या सिनेमाचं वादळच आलं असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. या केजीएफच्या वादळात 'जर्सी','बीस्ट' सारख्या मोठ्या स्टार्सचे सिनेमे कुठल्या कुठे फेकले गेले त्याचा पत्ताच लागला नाही. 'केजीएफ चॅप्टर २' च्या पोस्ट क्रेडिट सीन दरम्यानच दिग्दर्शक प्रशांत नीलनं या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची झलक दाखवलीच होती. तेव्हापासूनच चाहते 'केजीएफ ३' ची वाट पहायला लागले आहेत.

हेही वाचा: Good News: भारतासाठी दीपिकाची 'ही' कामगिरी ठरतेय लक्षवेधी

चाहते जाणून घ्यायला उत्सुक आहेत की अखेर काय हटके या भागात दाखवलं जाणार आहे? सिनेमात रमिका सेननं रॉकीच्या विरोधात जे डेथ वॉरंट काढलं आहे,त्यामुळे खरंच रॉकी मरणार का? की जगावर राज्य करायचं आईचं स्वप्न पूर्ण करणार आहे. आता रॉकी म्हणजे अभिनेता यश यानं सांगितलं आहे की,''केजीएफ चॅप्टर ३ केव्हा बनून पूर्ण होणार आणि ,सिनेमात काय काय सीन असणार आहेत. यशनं एका मुलाखतीत सांगितलं आहे की,"आता सिनेमाच्या तिसऱ्या भागात रॉकीच्या आयुष्यात आणि कथेत खूप काही बदल दिसणार आहेत".

हेही वाचा: शाहिदच्या 'जर्सी'चे राम गोपाल वर्मानं काढले वाभाडे, म्हणाला....

यश म्हणाला आहे, '' मी आणि दिग्दर्शक प्रशांत नीलनं 'केजीएफ चॅप्टर ३' साठी खूप वेगवेगळ्या सीन्सचा विचार केला आहे. खूप साऱ्या गोष्टी 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये दाखवायच्या राहून गेल्या आहेत. म्हणून आम्हाला वाटतं की खूप सारं वेगळं पाहता येईल केजीएफ ३ मध्ये आणि अधिक चांगले सीन्स दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण या फक्त आयडिया आहेत आणि सध्या तरी यावर काम सुरु नाही केलं,फक्त डोक्यात विचार सुरू आहेत.

Web Title: Yash And Prasanth Neel Have Discussed Kgf 3 There Are Lots Of Kick A

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top