यशोमती ठाकूर यांना भाजप कडून मुख्यमंत्री पदाची ऑफर,पण.. | yashomati thakur on kitchen kallkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yashomat thakur on kitchen kallakar

यशोमती ठाकूर यांना भाजप कडून मुख्यमंत्री पदाची ऑफर,पण..

झी मराठीवरील (zee marathi) ‘किचन कल्लाकार’ (kitchen kallakar) हा कार्यक्रम सध्या गाजत आहे. या कार्यक्रमात केवळ कलाकारच नाही तर विविध क्षेत्रातील मंडळी हजेरी लावतात. विशेष म्हणजे राजकारणातील दिग्गज व्यक्तीं या कार्यक्रमात येऊन धमाल करतात. राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाजू या कार्यक्रमाने समोर आणल्या आहेत. जेवण बनवणे, खेळ खेळणे आणि पडद्यामागच्या गप्पांमधून थट्टा मस्करी करणे असा काहीसा बाज या कार्यक्रमाचा आहे. या मंचावर यंदा तीन महिला राजकारणी येणार आहेत.

हेही वाचा: मालिका सोडण्याबाबत हृता दुर्गुळेचे मोठे विधान, म्हणाली...

या आधीही अनेक राजकारणी येऊन गेले आहेत. पण हा भाग विशेष ठरणार आहे. कारण महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) आणि भाजपच्या डॅशिंग दबंग आमदार श्वेता महाले (shweta mahale) या तीन धुरंदर राजकारणी महिला 'किचन कल्लाकार'मध्ये हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा: स्मशानभूमीत केला चित्रपटाचा मुहूर्त : फनरल चित्रपटाचे पोस्टर अनावरण..

झी मराठीकडून या भागाचा टिझर ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये आमदार श्वेता महाले यांना एक फोटो दाखवून संबंधित व्यक्तीविषयी मत विचारण्यात आलं. यावेळी श्वेता महाले यांना मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोटो स्क्रीनवर दाखवण्यात आला. फोटो पाहिल्याबरोबर श्वेता महालेंनी दीर्घ श्वास घेत, 'राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री...' असं विधान केलं पण पुढे त्या म्हणाल्या 'पण भाजपमध्ये येऊन...' त्यांच्या या गमतीशीर वक्तव्याने मंचावर एकच हशा पिकला. त्यांच्या या वक्तव्यावर स्वतः यशोमती ठाकूरही पोट धरुन हसल्या.

यानंतर सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) याने यशोमती ठाकूर यांना महालेंच्या वक्तव्यावर बोलण्याची विनंती केली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी दिलेली उत्तर ऐकण्यासारखे आहे. 'श्वेता महाले माझ्या चांगल्या मैत्रिण आहेत. त्या माझ्याबद्दल एवढं चांगलं चिंततात . माझं चांगलं व्हावं, असं त्यांना नेहमी वाटतं. पण मला मुख्यमंत्री पद नाही मिळालं तरी चालेल पण विचारधारेशी तडजोड करणार नाही,' असं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.

Web Title: Yashomati Thakur On Kitchen Kallkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top