किंग खानची गोष्टच न्यारी, इजिप्तमध्ये त्याचं नाव घेतल्यानं महिलेला झाला फायदा |Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किंग खानची गोष्टच न्यारी, इजिप्तमध्ये त्याचं नाव घेतल्यानं महिलेला झाला फायदा

किंग खानची गोष्टच न्यारी, इजिप्तमध्ये त्याचं नाव घेतल्यानं महिलेला झाला फायदा

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) भले बरेच दिवस रुपेरी पडद्यावर दिसला नसेल पण त्याचे चाहते जगभर आहेत. शाहरुख खानची भारतातच नाही तर संपूर्ण जगात कशी ओळख आहे, याचे आज आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एका महिलेचे ट्विट (Tweet) सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याने सांगितले आहे की शाहरुख खानने तिला कशी अनेकदा मदत केली आहे.

अश्विनी देशपांडे (Ashwini Deshpande) नावाच्या या महिलेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'इजिप्तमधील एजंटला प्रवासासाठी पैसे ट्रान्सफर करावे लागले. पैसे ट्रान्सफर करताना अडचण आली.

तो (एजंट) म्हणाला- तू शाहरुख खानच्या देशाची आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी बुक करतो. तू मला पैसे नंतर दे. इतर कोणत्याही बाबतीत मी असे करणार नाही, पण शाहरुख खान आणि त्याने आपल्याला जे काही दिले आहे त्यासाठी मी काहीही करू शकतो.

एजंट म्हणाला, 'शाहरुख खान राजा आहे.' या महिलेचे हे ट्विट इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. हे ट्विट फॅन पेजवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे आणि जगभरात शाहरुख खान आणि त्याच्या चित्रपटांचे चाहते किती वेडे आहेत हे पुन्हा एकदा समोर आले आहे. याआधीही अशा प्रकारच्या कथा अनेकदा समोर आल्या आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर किंग खान याआधी 'झिरो' (Zero)चित्रपटात दिसला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

सलग अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर किंग खानने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आता तो लवकरच 'पठाण' (Pathan) चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतणार आहे. किंग खानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top