'पण तु मदर तेरेसा प्रमाणे शांतदेखील बसत नाही'; वसिम अक्रमची पत्नी शानिएराने कंगणाला केलं क्लिन बोल्ड

युगंधर ताजणे
Wednesday, 23 September 2020

“कदाचित भांडणाला तू सुरुवात करत नसशील, पण मदर तेरेसा यांच्यासारखी तू शांत देखील नाहीस.” अशा आशयाचं ट्विट करुन शानिएराने कंगनाला सुनावले आहे.

मुंबई - “लोक मला भांडखोर प्रवृत्तीची व्यक्ती समजतात, परंतु हे खरे नाही. आजपर्यत मी कधीही स्वत:हून लढाई सुरु केली नाही. कुणी आरोप केल्यानंतरच त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. या लढाईची सुरुवात माझ्यामुळे झाली हे जर कोणी सिद्ध करुन दाखवलं तर मी ट्विटर कायमचं सोडून देईन. असं कंगणा म्हणाली खरी माञ यावर तिला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वासिम अक्रमची पत्नी शानिएरा अक्रम हिने खडसावले आहे. “कदाचित भांडणाला तू सुरुवात करत नसशील, पण मदर तेरेसा यांच्यासारखी तू शांत देखील नाहीस.” अशा आशयाचं ट्विट करुन शानिएराने कंगनाला सुनावले आहे.

ड्रग्स कनेक्शन: दीपिका, सारा, श्रद्धासोबत ७ जणांना एनसीबीने बजावले समन्स, तीन दिवसात हजर राहण्याचे दिले आदेश -

  कंगणाचे सोशल मीडिया वॉर थांबायचे नाव घेत नाही. भगवान श्री कृष्ण यांनी सांगितलय जर कोणी लढाईसाठी आव्हान देत असेल तर त्या आव्हानाला नकार देऊ नका.” अशा आशयाचं ट्विट कंगना रणौतने केलं होतं. यावर शानिएराने कंगनाला प्रत्युत्तर दिले आहे.  महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अलिकडेच तिने आपल्या विरोधकांना एक आव्हान दिलं होतं. ही लढाई कंगनाने सुरु केली, असं कोणी सिद्ध करुन दाखवलं तर ती ट्विटर कायमचं सोडून देईल असं ती म्हणाली होती

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, अग्गंबाई सासुबाईच्या शूटींगला ब्रेक - 

   एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: But you dont sit still like Mother Teresa Wasim Akrams wife Shaniera made comments on kangana