संगीत दुनियेत स्वतःचा ब्रँड तयार करणारा युवान

वृत्तसंस्था
Saturday, 31 August 2019

 युवान शंकर राजा म्हणजे अगदी बालवयातच संगीत क्षेत्रात करिअरला सुरवात करणारा व आज आपले स्वत:चे एक ब्रॅड तयार करणारा तमीळ संगीतकार होय. त्याने अगदी कमी कालावधीत आपले स्थान आबाधित केले आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याची सध्या सोशल मिडियात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला सकाळ टीमकडून शुभेच्छा!  ​

चेन्नई : युवान शंकर राजा म्हणजे अगदी बालवयातच संगीत क्षेत्रात करिअरला सुरवात करणारा व आज आपले स्वत:चे एक ब्रॅड तयार करणारा तमीळ संगीतकार होय. त्याने अगदी कमी कालावधीत आपले स्थान आबाधित केले आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याची सध्या सोशल मिडियात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला सकाळ टीमकडून शुभेच्छा!  

युवान शंकर राजा हा तमिळमधील एक फेमस संगीतकार, गायक आहे. त्याने अंत्यत कमी कालावधीत आपले नाव डाॅलिवूडमध्ये फेमस केले आहे. त्याने तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत देखील संगीत दिले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने आपल्या संगीत करिअरला सुरवात केली. त्याने अरविंदन या चित्रपटातील गीतांची शब्दरचना देखील केली आहे. त्यानंतर त्याने अनेक दक्षिणेतील अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यामध्ये धीना, मन्मदन, पारुथिवीरन, बिल्ला अशा मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या चित्रपटांचा समावेष हाेता.

मागील 6 वर्षांमध्येच त्याने आपले नाव या तमीळ इंडस्ट्रीमध्ये उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. 13 वर्षाच्या करिअरमध्ये त्याने 75 चित्रपटांना संगीत दिले आहे. प्रतिभासंपन्न असलेला युवान नेहमी नवीन संगीत प्रकार आणण्याचा फ्रयत्न करतो. युवा पिढीमध्ये युवानचे संगीत खुपच लोकप्रिय आहे. तमिळ इंडस्ट्रीमध्ये त्याने हिप हॉप व रीमिक्सची सुरवात केली. तमिळमधील युवा संगीताचे प्रतिक म्हणजे युवान होय.

तसेच त्याने अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत देखील दिले आहे. युवानला 2004 मध्ये तो 25 वर्षांचा असताना 7g रेनबो कॉलोनी या संगीतासाठी फ़िल्मफ़ेयर अॅवा़र्ड देखील मिळाले आहे. सर्वात कमी वयात हे अॅवा़र्ड मिळवणारा तो एकमेव संगीतकार ठरला आहे. त्याला 2006 मध्ये 2 फिल्मफेअर देखील भेटले आहेत. तमिळनाडू राज्य सरकारने देखील त्याला राज्य चित्रपट पुरस्कार दिला आहे. 

ही आहे युवानची प्रियसी - रामसाठी साइप्रस अंतर्राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात त्याला पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. असा पुरस्कार मिळवणारा तो एकमेव भारतीय होय. 31 आॅगस्ट 1979 ला चेन्नई येथे त्याचा जन्म झाला. युवान हा अंत्यत प्रतिष्टीत कुंटुबात त्याचा जन्म झाला. संगीतकार इलयराजा आणि जीवा यांचा तो तिसरा मुलगा होय. सेंट बेडे स्कूलमध्ये त्याचे शिक्षण झाले. युवानचे लग्न त्याची  प्रियसी सुजया चंद्रन हिच्यासोबत 2005 मध्ये झाले आहे. त्यांची पहिली भेट लंडन येथील एका संगीत कार्यक्रमात झाली होती. सध्या युवान हा सोशल मिडियात चर्चेचा विषय ठरला आहे. युवानचा आज वाढदिवस देखील आहे #HappyBirthdayYuvan असा व्टिटरवरती ट्रेंड सुरु आहे.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man creating his own brand in the world of music