सूरज पांचोलीची आई आणि अभिनेत्री झरिना वहाब कोविड पॉझिटीव्ह, पाच दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होत्या ऑक्सिजन सपोर्टवर

zarina wahab
zarina wahab

मुंबई- कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. बच्चन कुटुंबिय, अर्जुन कपूर, मलायका अरोरा सोबत इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. आता अभिनेत्री झरिना वहाब यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचं कळतंय. गेल्या आठवड्यात झरिना यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

झरिना वहाब यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. हॉस्पिटलशी संबंधित अधिका-यांनी सांगितलं की त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं आणि त्या चांगला प्रतिसाद देत होत्या. त्यांना गुपचुप पद्धतीने हॉस्पिटलला नेलं गेलं आणि ही गोष्ट कुटुंबिय, नातेवाईक आणि काही जवळच्या मित्रपरिवारापुर्तीच मर्यादित ठेवली गेली होती. त्यांच्यावर डॉ. जलील परकार यांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरु होते.

डॉक्टरांनी त्या कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं कन्फर्म केलं आहे. त्यांनी सांगितलं की 'झरिना यांना गुडघ्यांमध्ये त्रास, अंगदुखी, थकवा आणि ताप होता. जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी खूप कमी होती.' मात्र अजुनही त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला की नाही हे समजू शकलेलं नाही. झरिना या घरी परतल्या आहेत.  जलील जलील परकार यांनी सांगितलं की त्या आता होम क्वारंटाईन आहेत आणि आता त्यांची स्थिती पहिल्यापेक्षा चांगली आहे. 

अभिनेत्री झरिना वहाब यांनी त्यांच्या करिअरमध्ये 'चितचोर', 'घरोंदा' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्या टीव्ही मालिकांमध्येही सक्रिय आहेत. सूरज पांचोली झरिना वहाब यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हा सूरजचं नाव दिशा सालियन केसमध्ये आलं होतं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाची बाजू घेतली होती.    

zarina wahab infected with covid 19 was put on oxygen support  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com