esakal | 'एकमेकांवर संशय घेण्यापेक्षा वेगळं व्हा', मार्टिनाचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

'एकमेकांवर संशय घेण्यापेक्षा वेगळं व्हा', मार्टिनाचा सल्ला

'एकमेकांवर संशय घेण्यापेक्षा वेगळं व्हा', मार्टिनाचा सल्ला

sakal_logo
By
युगंधर ताजणे

टेनिसविश्वात वेगवेगळे विक्रम करणारे खेळाडू म्हणून महेश भुपती आणि लिएंडर पेस (Leander Paes & Mahesh Bhupathi) यांचं नाव घ्यावं लागेल. कालांतरानं या खेळाडूंमध्ये वाद झाले आणि त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही खेळाडूंनंतर भारतीय टेनिस विश्वाला त्यांच्यासारख्या खेळाडूंची उणीव ही नेहमीच जाणवत राहिली. सध्या त्यांच्याकडे येणाऱ्या एका वेबसीरिजची मोठी चर्चा आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माता अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांनी जीवंत केले आहे. टेनिस आयकॉन त्याच्या विभाजनाबद्दल स्पष्ट आणि प्रामाणिक असल्याची ही पहिलीच वेळ आहे आणि कथेमध्ये आपली बाजू मांडून अटकळांना पूर्णविराम देत आहेत. ट्रेलरमध्ये टेनिस आयकॉन मार्टिना हिंगिस, सानिया मिर्झा, रोहन बोपन्ना यांनी ली-हॅशच्या आयकॉनिक भागीदारीवर आपले विचार मांडले आहेत आणि यांनी ब्रेकअपच्या टोकावर असताना ही, ग्रँड स्लॅम जिंकताना पाहिले आहे.

झी5 वर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. सात भागांची ही मालिका केवळ त्यांच्या टेनिस मॅचेस च्या इतिहासावरच नाही तर ऑन आणि ऑफ कोर्ट दोघांच्या नात्यावर देखील प्रकाश टाकेल. टेनिस कोर्टवरील त्यांच्या सर्वोत्तम खेळासोबतच, या जादुई जोडीचे ऑफ-कोर्ट जीवन आणि त्यांचे सार्वजनिकरित्या वेगळे होणे हे देखील तेवढेच चर्चेत राहिले ज्याने अवघा देश हळहळला. दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपति यांचे ऑफ-कोर्ट जीवन आणि त्यांच्या प्रतिष्ठित अशा ऑन-कोर्ट भागीदारीवर आधारित ही मालिका असणार आहे. त्या मालिकेचं नाव ब्रेक पॉइंट असं आहे. ती सात भागांची मालिका आहे. झी5 पुरस्कार विजेती निर्माता जोडी अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

खेळाच्या मैदानातील प्रसिद्ध पाहुण्यांच्या यादीत मार्टिना हिंगिसचा देखील समावेश आहे - जिने लिएंडर पेस आणि महेश भूपति दोघांसोबत डबल्स खेळले आहे, जेव्हा पेस आणि भूपतिने वेगळे होण्याचा निश्चय केला, त्याविषयी बोलताना मार्टिना हिंगिस म्हणते की,"एकतर तुम्ही एकत्र राहू शकता की नाही, मात्र निर्णय घेताना संकोच करण्याची वेळ नाही आहे, आणि एकदा जर तुम्ही तुमच्या भागीदारावर संशय घेणे सुरू करता, त्यापेक्षा वेगळे होणे चांगले. मार्टिना पुढे म्हणते की, "त्यांनी जे काही केले, ते त्यांनी शेअर केले... त्याच्या कथा आणि त्याचे यश, हे असे काही आहे जे नेहमीच आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करेल.

loading image
go to top