भारत गणेशपुरे पुन्हा अडकले लग्नाच्या बेडीत.. काय आहे भानगड.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zee marathi band baja varat news season for celebrity wedding

भारत गणेशपुरे पुन्हा अडकले लग्नाच्या बेडीत.. काय आहे प्रकरण..

बँड बाजा वरात : सध्या मराठीमध्ये अनेक हटके कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अनेक मराठी वाहिन्या वेगवेगळे प्रयोग करत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झी मराठी वाहिनीनेही असाच एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी सुरू केला. 'बँड बाजा वरात' (Band Baja Varat) असे या कार्यक्रमाचे नाव असून एक वेगळी संकल्पना या माध्यमातून समोर आली. लग्न जमलेल्या नवं दाम्पत्याला मंचावर बोलवून वेगवेगळे खेळ खेळून त्यांच्या लग्नात त्यांना आहेर भेट देण्याचा हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला. आता या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरू होत आहे. ज्यामध्ये झी मराठी वाहिनी काही कलाकारांचे पुन्हा लग्न लावणार आहे. यामध्ये नुकताच अभिनेते भारत गणेशपुरे यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे सहभागी झाले होते. (zee marathi band baja varat news season for celebrity wedding) (bharat ganeshpure wedding in band baja varat) (kishori shahane wedding in band baja varat)

हेही वाचा: 'दे धक्का २' चा धमाकेदार टीझर.. या दिवशी होणार रिलीज

आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोज मधून पाहतो पण जर प्रत्यक्षात त्यांचे लग्न आपल्याला पाहायला मिळणे कठीण आहे. पण प्रेक्षकांची ही इच्छा झी मराठी वाहिनीने पूर्ण केली आहे. याद्वारे प्रेक्षकांना आपल्या लाडक्या सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळणार आहे. लवकरच 'बँड बाजा वरात' सेलिब्रिटींच लग्न जोरात हे पर्व सुरू होत आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटीजच्या लग्नाचा थाट, त्यांचा आता पर्यंतचा प्रवास त्यातील गमती-जमती पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे सेलिब्रिटीना देखील त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पुन्हा एकदा जगायला मिळतील.

या पर्वाच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना अभिनेता भारत गणेशपुरे व त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळेल. हे दोनही भाग १७ आणि १८ जून रोजी प्रदर्शित होणार आहेत. तर लवकरच या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे लग्नही पाहायला मिळणार आहे.

Web Title: Zee Marathi Band Baja Varat News Season For Celebrity Wedding

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top