'देवमाणूस२' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; पहा पहिली झलक | Devmanus 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devmanus serial

'देवमाणूस२' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; पहा पहिली झलक

झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' Devmanus या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली होती. ऑगस्ट महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता ही मालिका एका नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देवमाणूस २' या नव्या मालिकेची नुकतीच घोषणा झाली आहे. या मालिकेचा प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस' या एका वेगळ्या धाटणीच्या मालिकेने आपल्या लोकप्रियतेने छोट्या पडद्यावरील टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. 'देवमाणूस' या मालिकेने ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आता 'देवमाणूस २' पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला पुन्हा एकदा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: 'याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार', महेश मांजरेकरांवर नेटकरी चिडले

'देवमाणूस'मध्ये डॉक्टर अजित कुमार देवचा मृत्यू न दाखवल्यामुळे या मालिकेचा पुढील भाग येणार याची कल्पना प्रेक्षकांना होती. त्यामुळेच आता 'देवमाणूस २' या दुसऱ्या सिझनमध्ये नक्की काय दाखवण्यात येणार आहे, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच झी मराठी वाहिनीवरील एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'ती परत आलीये' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या जागी 'देवमाणूस २' प्रसारित होणार आहे.

पहिल्या भागात कथेचा अंत झाला नाही

गावाबाहेर लागलेल्या आगीत चंदाचा मृतदेह गावकऱ्यांना दिसतो. त्याजवळच डॉक्टरचा चष्मा, पेन आणि घड्याळ दिसतं. यावरून डॉक्टरचाही आगीत अंत झाला, असा अंदाज गावकरी लावतात. दुसरीकडे वाड्यात हळूहळू गोष्टी पूर्ववत होत आहेत. एके रात्री सर्वजण झोपले असताना डिंपल हळूच आपली बॅग उचलून बाहेर पडते. हॉस्पिटलमध्ये एक माणूस अखेरचा श्वास घेतो आणि डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. डॉक्टर बाहेर जाताच तो माणूस पुन्हा जिवंत होतो. हा माणूस दुसरा, तिसरा कोणी नसून, देवीसिंग असतो. कथानकाच्या या शेवटामुळे दुसऱ्या सिझनची शक्यता वर्तवण्यात आली होती.

loading image
go to top