ZEE5 Global वर रंजक मराठी मालिका, चित्रपट आणि ओरिजनल्सची मेजवानी

ZEE5 Global वर रंजक मराठी मालिका, चित्रपट आणि ओरिजनल्सची मेजवानी
Summary

ZEE5 Global अमेरिकेत नुकतेच लाँच करण्यात आले. दक्षिण आशियाई कंटेंटसाठी ZEE5 Global हे आघाडीचे व्यासपीठ आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना आता ZEE5 Global वर अनेक मराठी टीव्ही मालिका पाहता येणार आहेत. यामध्ये झी मराठीवरील लोकप्रिय टीव्ही मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'अग्गंबाई सूनबाई' आणि 'पाहिले न मी तुला' यापासून ते 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२१', 'चला हवा येऊ द्या - लेडिज झिंदाबाद' आणि 'होम मिनिस्टिर - पैठणी आता माहेरच्या अंगणी' यांसारखे मराठी रिअॅलिटी शोसुद्धा पाहता येतील.

ZEE5 Global अमेरिकेत नुकतेच लाँच करण्यात आले. दक्षिण आशियाई कंटेंटसाठी ZEE5 Global हे आघाडीचे व्यासपीठ आहे. अमेरिकेत राहणाऱ्या दक्षिण आशियाई नागरिकांच्या मनोरंजनासाठी ZEE5 Global हे हक्काचे ठिकाण असून ZEE5 Global वर तुम्ही तुमच्या पसंतीच्या भाषेतील टीव्ही शो, चित्रपट पाहू शकता. माफक दरात तुम्हाला दर महिन्यात नवीन कलाकृती पाहता येणार आहेत. ZEE5 Global च्या कंटेंट लायब्ररीमध्ये आपल्याला ZEE मराठी, ZEE TV, ZEE बांग्ला आणि सर्व झी चॅनेलवरील टीव्ही कार्यक्रम मिळतात. एक वर्षासाठी याला फक्त $ 49.99 इतका खर्च असून यात 1600+ क्लासिक ऑन एअर आणि ऑफ एअर टीव्ही शो, 3500+ ब्लॉकबस्टर बॉलिवूड आणि प्रादेशिक भारतीय चित्रपट तसंच 200+ एक्स्लुझिव्ह ओरिजनल चित्रपट पाहता येतात.

मराठी प्रेक्षकांना 'स्वराज्य रक्षक संभाजी', 'दिल दोस्ती दुनियादारी', 'जुळून येती रेशिमगाठी', 'तुझ्यात जीव रंगला' यांसारख्या क्लासिक मालिका बघायला मिळतील. तसंच ज्यांना 'आनंदी गोपाळ', 'सैराट', 'मुळशी पॅटर्न', 'पुनश्च हरि ओम', 'नाळ', 'कट्यार काळजात घुसली', 'धुरळा' यांसारखे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट पहायचे असतील त्यांना ZEE5 Global प्लॅटफॉर्म नक्कीच आवडेल.

अमेरिकेतील नव्या युजर्ससाठी ZEE5 धमाकेदारऑफर घेऊन येत आहे. सर्व आवडते टीव्ही शो, चित्रपट आणि ओरिजनल्स पाहण्यासह प्रेक्षकांना आता वार्षिक सबस्क्रिप्शन पॅकवर ३ महिने मोफत सेवा मिळणार आहे. म्हणजेच १५ महिन्यासाठीची मेंबरशिप ही फक्त ४९.९९ डॉलर्स मध्ये मिळेल. सध्या या पॅकसाठी ८४ डॉलर इतकी असलेली किंमत कमी करण्यात आली आहे. ही ऑफर पुढच्या ५ आठवड्यांसाठी असून १५ ऑक्टोबरपर्यंत दक्षिण आशियातील कंटेंट आवडणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

नवीन मालिका आणि गूढ कथा

नव्या शोमध्ये 'माझी तुझी रेशिमगाठ'चा समावेश आहे. यातून श्रेयस तळपदे मराठी पडद्यावर तब्बल 17 वर्षांनी पुनरामगन केले. यात श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहे. 'माझी तुझी रेशिमगाठ' ZEE5 Global वर पाहता येणार आहे. तसंच 'मन झालं बाजिंद' या मालिकेत राया (श्वेता राजन) आणि कृष्णा (वैभव चव्हाण) या जोडीचा कलगीतुरा पाहायला मिळणार आहे. ही मालिकासुद्धा 23 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'मन उडु उडु झालं' या मालिकेत एक रावडी मुलगा सुंदर-सोज्वळ मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेत कोणती वळणे येतात, याची रंजक कथा पहायला मिळतेय. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एकमेकांच्या प्रेमात असलेले अजिंक्य आणि श्रुती लग्न करतात आणि लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहतात. श्रुतीचा याला विरोध असतो, मात्र एकत्र कुटुंबाबद्दलचे तिचे विचार कालांतराने बदलतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

रहस्य आणि भयपटांची आवड असणाऱ्या मराठी प्रेक्षकांसाठी 16 ऑगस्टपासून 'ती परत आलीये' ही मालिका प्रसारित होत आहे. नऊ मित्र एका निर्जनस्थळी पुन्हा एकदा एकत्र येतात यावर मालिकेचं कथानक आहे. 'रात्रीस खेळ चाले ३' या मालिकेतून अण्णा नाईक परतले असून कुटुंबातील अनेक रहस्य आणि गूढ घटनांचा पर्दाफाश आगामी भागांमध्ये ते करणार आहेत.

मराठी आणि हिंदीमध्ये अॅक्शन पॅक्ड ओरिजिनल्स

ZEE5 Global च्या कंटेंट लायब्ररीमध्ये अॅक्शन-पॅक्ड मराठी ओरिजनल्सचाही समावेश आहे. 'वीरगती' या चित्रपटात यतिन कार्येकर, राधिका हर्षे, निखिल चव्हाण आणि अदिती भास्कर यांच्या भूमिका आहेत. यात दहशतवाद्यांमध्ये सामील झालेल्या एका तरुण मुलाची भेट जवानाशी होते. २० ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'डेट विथ सई' या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री सईने स्वत:चीच भूमिका साकारली आहे. सईचा सतत पाठलाग करणारा, तिच्या हालचालींचा मागोवा घेणारा आणि तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवू इच्छिणाऱ्या एका चाहत्याची कथा यात मांडण्यात आली आहे. ZEE5 Global वर ‘गोंद्या आला रे’, ‘धागा’आणि ‘लिफ्ट मॅन’अशा इतरही ओरिजिनल सीरिज आहेत.

ZEE5 Global वर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये '२०० हल्ला हो' याचा समावेश आहे. दलित स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाचे वर्णन करणाऱ्या हिंदी चित्रपटात 'सैराट' फेम रिंकू राजगुरू, अमोल पालेकर आणि बरुण सोबती यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात महाराष्ट्रातील एक घटना अधोरेखित करण्यात आली आहे, जिथे २०० महिलांनी कायदा हाती घेत गुंड, दरोडेखोर, सीरिअल किलर आणि बलात्काऱ्याला कोर्टाच्या आवारात मारले होते.

अशाच प्रकारच्या ओरिजनल्स इतर भाषांमध्ये पाहण्यासाठी इच्छूक असलेल्या प्रेक्षकांसाठी आणखी काही चित्रपट आहेत. यात 'स्टेट ऑफ सीज: टेम्पल अटॅक' हा २००२च्या दहशतावादी हल्ल्यावर आधारित नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. २००२ मध्ये गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. त्याचसोबत धूमधडाक्यात होणाऱ्या भारतीय लग्नाबाबतची कथा '१४ फेरे' यामध्ये दाखवण्यात आली आहे.

विविध भाषांमध्ये टीव्ही शोजची उपलब्धता

18 विविध भाषांमध्ये 170,000 हून अधिक तासांचा मनोरंजन करणारा कंटेट प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. अमेरिकेतील प्रेक्षक 'कुंडली भाग्य', 'कुमकुम भाग्य', 'भाभीजी घर पर है', 'और भाई क्या चल रहा है?', 'भाग्यलक्ष्मी', 'पवित्र रिश्ता', 'कुबूल है' आणि 'जोधा अकबर' यांसारख्या लोकप्रिय मालिका पाहू शकतात. ZEE5 Global वर २३ ऑगस्टपासून 'रिश्तों का मांझा' आणि 'मीत' या दोन नव्या हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

युझर्स ZEE5 अॅप हे गुगल प्लेस्टोअर iOS अॅप स्टोअर, रोकू डिव्हाइस, सॅमसंग स्मार्टटीव्ही, अॅपल टीव्ही, अँड्रॉइड टीव्हीआणि अॅमेझॉन फायरस्टिकवरून डाऊनलोड करू शकतात. www.ZEE5.comवरही ZEE5 उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com