पॅरिसमधल्या अमानुष घटनेबद्दल जिशान आयुब म्हणाला...

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार इतिहासाच्या त्या शिक्षकाने पैगंबर यांचे एक कॅरिकेचर मुलांना दाखवले होते. शुक्रवारी शिक्षकाचा एकाने शिरच्छेद केला. काही वेळाने पोलिसांनी त्या मारेक-याला मारले.

मुंबई - पॅरिसमध्ये घडलेल्य़ा त्या भयानक घटनेनंतर संपूर्ण जगभरातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. लेखक, मानवधिकाचे कार्यकर्ते, सामाजिक काम करणा-या संघटना यांनीही त्या घटनेची तीव्र निषेध केला आहे. बॉलीवूडच्या काही कलाकारांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सध्या अभिनेता जिशान आयुब या अभिनेत्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

पॅरिसमधील शाळेत एका शिक्षकाने मुलांना मोहम्मद पैगंबर यांचे कार्टुन दाखवले. त्यानंतर त्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे जगभर पडसाद उमटले. यावर परखड शब्दांत आयुबने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो,  "धार्मिक कट्टरता और जहालत, हमेशा साथ साथ चलते हैं."  अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार इतिहासाच्या त्या शिक्षकाने पैगंबर यांचे एक कॅरिकेचर मुलांना दाखवले होते. शुक्रवारी शिक्षकाचा एकाने शिरच्छेद केला. काही वेळाने पोलिसांनी त्या मारेक-याला मारले.

आतापर्यत या घटनेवर अभिनेत्री स्वरा भास्करनेही प्रतिक्रिया दिली आहे. घटनेविषयी अधिक माहिती देताना फ्रान्सच्या दहशतवादीविरोधी पथकाने सांगितले की, आमच्याकडून तातडीने या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. ज्याठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण फ्रान्सच्या राजधानीच्या पश्चिमेला आहे. त्यादिवशी तो शिक्षक नेहमीप्रमाणे मुलांना इतिहासाचा पाठ शिकवत होता. यावर त्याने मुलांशी चर्चाही केली होती. आतंकवादी घटनेशी संबंधित घटना असल्याचे तपासयंत्रणेने सांगितले आहे.गेल्या महिनाभरापासून एका 25 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तिवर या घटनेबाबत संशय़ व्यक्त केला जात आहे. त्याच्यावर काही आरोपही करण्यात आले आहे. 

 
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zeeshan Ayyub reaction on Paris teacher beheaded