#SakalForMaharashtra 'एकत्र येऊया...' उपक्रमात वाचकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

मोर्चा, आंदोलन करणे हे तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्यासाठी ठीक आहे. पण हे करताना आपण आपल्यापरीने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी अभिनेत्री असल्याने आमच्या क्षेत्रात संधी कधी सांगून येतील हे सांगू शकत नाही. मात्र, प्रत्येकाने आपल्याला चांगली संधी कशी मिळेल यासाठी कायम प्रयत्नशील असले पाहिजे. अभिनयाच्या क्षेत्रात कोणाला काही करायचे असेल तर अभिनयाला पूरक गोष्टी म्हणजेच नृत्य शिकणे किंवा फिटनेस ठेवणे, नवीन भाषा आणि त्याबरोबर स्वतःमध्ये चांगले बदल करत राहणे गरजेचे आहे.

- प्रिया मराठे, अभिनेत्री. 

"सकाळ'ने सुरू केलेला हा उत्तम प्रयत्न आहे. केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणे खूप महत्वाचे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकत्र आणून समाजासाठी काम करणे चांगले आहे. या उपक्रमात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल, त्यासाठी एकत्रितपणे विचार करता येईल. एकत्रितपणे काम केल्यामुळे त्याचा अधिक उपयोग समाजघटकांसाठी होऊ शकतो.

- मुमताज शेख, समनव्ययक, कोरो. 
 
"सकाळ'ने सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. राज्यातील तरूण शेतकऱ्यांना कृषिपूरक रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीवर असलेला अतिरिक्त ताण कमी होईल आणि ग्रामीण भागामध्ये रोजगारनिर्मीतीला चालना मिळेल. त्यामुळे स्थलांतरितांचा प्रश्न सुटून शहरात होणाऱ्या गर्दीचाही प्रश्न मार्गी लागेल. सकाळच्या या उपक्रमात मी माझेही योगदान देतो.

- अंबादास चंदनशिवे,अवर सचिव, मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SakalForMaharashtra comments mumbai