#MarathaKrantiMorcha क्रांतिदिनी मराठा जनआंदोलनाचा एल्गार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 July 2018

लातूर - मराठा आरक्षण व इतर मागण्यांसंदर्भात शासनाने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी येत्या क्रांतिदिनी नऊ ऑगस्टला राज्यभर मराठा क्रांती जनआंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात गुरेढोरे, कुटुंबांसह गावागावांत मराठा समाज रस्त्यावर उतरेल, अशी माहिती आज मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत दिली. 

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आज येथे संपन्न झाली. चार तासांच्या या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांनी आतापर्यंतच्या आंदोलनाचा आढावा घेतला. या वेळी २२ जिल्ह्यांतील समन्वयक उपस्थित होते.   

दरम्यान, क्रांतिदिनी म्हणजे नऊ ऑगस्टला राज्यभर होणाऱ्या मराठा क्रांती जनआंदोलनाच्या दिवशी राज्यात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शाळा, महाविद्यालये बंद राहतील. कार्यकर्ते शासकीय कार्यालये बंद पाडतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यापुढे शासनासोबत चर्चेस कोणी गेले तर ते खपवून घेतले जाणार नाही. मुंबईत झालेली चर्चा आमच्यावर बंधनकारक नाही, अशी माहिती या वेळी देण्यात आली. 

बैठकीतील ठराव
आमदार, खासदारांच्या घरांसमोर १ ते ९ ऑगस्टदरम्यान ठिय्या
आंदोलकांवरील सर्व गुन्हे तत्काळ व बिनशर्त मागे घ्यावेत
आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी; कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरीत घ्यावे
आता शासनासोबत चर्चा नाही, कोणीही मध्यस्थी व चर्चेस जाऊ नये
काकासाहेब शिंदे व रोहन तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा व गुन्हेही नोंदवा
आरक्षणासाठी तत्काळ विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे
आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारसोबत असहकार आंदोलन 
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची पुढील बैठक परभणीत घेणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar of the Maratha kranti Morcha on the day of revolution