मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईत जेलभरो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 August 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोरच एकतास ठिय्या दिला. या आंदोलनामुळे वाहतुकही ठप्प झाली होती.

अंबाजोगाई : मराठा आरक्षणाच्या घोषणा देत बुधवारी (ता. 1) येथील बसस्थानकासमोर 150 कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी 25 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.  

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोरच एकतास ठिय्या दिला. या आंदोलनामुळे वाहतुकही ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी ॲड. माधव जाधव, प्रशांत आदनाक, प्रशांत शिंदे, नेताजी साळुंके, योगेश कडबाने, दिग्विजय लोमटे, प्रशांत गोपीनाथ शिंदे, गणेश मोरे, प्रविण गंगणे, राणाप्रताप चव्हाण, महेश कदम, अमोल लोमटे, अजय पवार, भीमसेन लोमटे, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पतंगे, राहुल लोमटे, सुधाकर कचरे, निलेश जाधव, मेघराज जोगदंड, लकी जगदाळे, प्रविण मोरे, गोविंद पोतंगले, विजयकुमार गंगणे यांच्यासह 25 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या आंदोलना दरम्यान पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jailbharo Agitation at Ambejogai Marathwada for Maratha Reservation