अतुल सावे, चंद्रकांत खैरे, हरीभाऊ बागडे हाय हाय! 

प्रकाश बनकर
Friday, 3 August 2018

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावेत या मागणीसाठी राज्यभरातील आमदार-खासदारांच्या कार्यालयसमोर आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.तीन) औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावेंच्या संपर्क कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यात अतुल सावे, चंद्रकांत खैरे,हरिभाऊ बागडे हाय हायचा करीत सरकार आणि लोकप्रतिनिधी विरोधातील रोष मराठा समाजाने व्यक्‍त केला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावेत या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. या मागणीसाठी अनेकांनी बलीदान दिले आहेत. हे करूनही सरकारला जाग येत नसल्याने मराठा समाजातर्फे लोकप्रतिनिधीच्या कार्यालसमोर आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील पुर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांच्या पुंडलीकनगर रोडवरील संपर्क कार्यालसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सावे, खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात जोरादार घोषणाबाजी केली.

लोकप्रतिनिधीनी मराठा समाजाच्या भावना समजून घेत त्यांचे प्रश्‍न प्रमुख्याने मांडावेत अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या महिला आणि पुरुषांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निवेदन स्वीकरण्यासाठी आमदार अतुल सावे नसल्याने आंदोलक चांगलेच भडकले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आणि अन्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येत आंदोलनकर्त्यांची भेट घेत निवेदन स्वीकरले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha agitation in aurangabad