Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी दोघांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 August 2018

औरंगाबाद/बीड - मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने, तर बीड तालुक्‍यात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

औरंगाबाद/बीड - मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने, तर बीड तालुक्‍यात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

औरंगाबादमध्ये केशव साहेबराव चौधरी (वय 45) यांनी न्यू हनुमाननगर येथील भाड्याच्या घरात सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या पत्नीने मुलांसह क्रांती चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येत आक्रोश व्यक्‍त केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेला असताना चौधरी कुटुंबीय क्रांती चौकात ठिय्या देऊन बसले होते.

बीड तालुक्‍यामध्ये आत्महत्या
बीड तालुक्‍यात सात्रा-पोत्रा येथील विद्यार्थ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.13) सकाळी उघडकीस आली. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. राहुल पद्माकर हावळे (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून, "डी.फार्मसी'ला प्रवेशासाठी शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याच्या नैराश्‍यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation two people suicide