बीड - मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे; तसेच शासनस्तरावरून ठोस निर्णय होईपर्यंत होऊ घातलेली मेगा नोकरभरती स्थगित करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. 27) दहाव्या दिवशीही जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच आहे. पुरुषोत्तमपुरी (ता. माजलगाव) येथे शुक्रवारी तरुणांनी जलआंदोलन केले. परळी, हिवरसिंगा (ता. केज), आडस व माळेगाव (ता. केज) येथे "रास्ता रोको', तर बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणांनी अन्नत्याग आंदोलन केले.

दरम्यान, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी परळी येथे महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे महिलांनी हाती बेलणे घेत शासनाला एकप्रकारे इशाराच दिला आहे. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजातील तरुणांनी अन्नत्याग आंदोलन केले. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीच्या बंधाऱ्यातील पाण्यात उतरून तरुणांनी जलआंदोलन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तमपुरी येथे प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा, केज तालुक्यांतील आडस व माळेगाव येथे मराठा समाजबांधवांनी रास्ता रोको आंदोलन करीत शासनविरोधी घोषणाबाजी केली.