#MarathaKrantiMorcha मराठवाडा पेटलेलाच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

हिंगोली
दाती फाटा (ता. कळमनुरी) येथे ट्रक पेटवला
आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुतेंना धक्‍काबुक्‍की
आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यालय फोडले
सेनगाव पंचायत समितीमधील गटविकास अधिकाऱ्यांचा कक्ष पेटवून देण्याचा प्रयत्न
दौडगाव, येळी फाटा (ता. औंढा) बोल्डा (ता. कळमनुरी) येथे रास्ता रोको
कळमनुरी-आखाडा बाळापूर मार्गावर साळवा पाटी (ता. कळमनुरी) येथे झाड टाकल्याने वाहतूक ठप्प
जिल्ह्यात एसटी वाहतूक ठप्प

नांदेड
पुणेगाव (ता. मुदखेड) येथे पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट
मराठवाडा-विदर्भ सीमेवरील धनोडा पॉईंट (ता. माहूर) येथे रास्ता रोको
राहेर (ता. नायगाव) येथे जलसमाधीसाठी निघालेल्यांना पोलिसांनी रोखले

परभणी
झरी (ता. परभणी) येथे अज्ञातांनी मोटार जाळली
विटा खु. (ता. सोनपेठ) येथे आंदोलकांतर्फे मुख्यमंत्र्याचे प्रतिकात्मक श्राद्ध, गोदावरीत अर्धजलसमाधी आंदोलन
पाथरी येथे तासभर ठिय्या आंदोलन
परभणीत शहरात शांतता, बाजारपेठ सुरळीत

औरंगाबाद
पैठणला आंदोलकांचे उपोषण मागे, तहसीलदारांची मध्यस्थी 
फुलंब्रीत काहींचे मुंडण, निधोना (ता. फुलंब्री) टायर जाळून रास्ता रोको
औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या दरम्यान शिवपारायणाचे वाचन

जालना
वडीगोद्री-जालना मार्गावर शहापूर फाटा (ता. अंबड) येथे रास्ता रोको, मुंडण 
वडीगोद्री-जालना मार्गावरील आंदोलनात विद्यार्थ्यांचाही सहभाग 
जाफराबाद शहरामध्ये सामूहिक मुंडण

बीड
बीडमध्ये अन्नत्याग आंदोलन
परळीत दहाव्या दिवशीही ठिय्या कायम, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी महिलांचे लाटणे घेऊन रास्ता रोको
पुरुषोत्तमपुरीत (ता. माजलगाव) तरुणांचे जल आंदोलन, प्रशासनाकडून खबरदारी
आडस, माळेगाव (ता. केज), हिवरसिंगा येथे रास्ता रोको

लातूर 
आमदारांनी राजीनाम्याची स्टंटबाजी थांबवण्याची छावा संघटनेची मागणी
वांजरवाडा (ता. जळकोट) येथे रास्ता रोको
देवणी येथे चक्काजाम आंदोलन
अहमदपूर येथे बंद, रॅली, घोषणबाजी, जलसमाधीचा इशारा
दर्जी बोरगाव (ता. रेणापूर) येथे रास्ता रोको, जलसमाधी आंदोलन

उस्मानाबाद
येडशी (ता. उस्मानाबाद) येथे मोबाईल टॉवरवर चढून आरक्षणाची मागणी, व्यापाऱ्यांचा दुकाने बंद ठेवून पाठिंबा
सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील आष्टामोड (ता. लोहारा) येथे चक्काजाम, टायर जाळले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha movement in Marathwada