Maratha Kranti Morcha: वाळूजमधील हल्लेखोरांना नोकरी नाही

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 August 2018

वाळूज (जि. औरंगाबाद) - वाळूज येथील औद्योगिक वसाहतीतील सुमारे ७० कंपन्यांमध्ये गुरुवारी जमावाने आलेल्या हल्लेखोरांनी तोडफोड केली. यात २० ते २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर त्यांना कोणत्याही कंपनीत नोकरी दिली जाणार नाही, असा निर्णय उद्योजकांनी आज जाहीर केला.

‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान वाळूजमधील कंपन्यांमध्ये हल्लेखोरांच्या टोळ्या घुसल्या होत्या. त्यांनी तेथील वाहने आणि यंत्रसामग्रीची तोडफोड केली. याचा निषेध नोंदविण्यासाठी शहरातील उद्योजकांची मराठवाडा ऑटो क्‍लस्टर येथे शुक्रवारी बैठक झाली. या वेळी सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, मकरंद देशपांडे यांच्यासह सर्व उद्योजक उपस्थित होते. 

हा हल्ला थांबविण्यास पोलिस असमर्थ ठरल्याचे मत सर्वांनी बैठकीत मांडले. सर्व कंपन्यांमधील हल्ल्याच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देऊन तक्रार करणार आहे, असे ‘सीएमआय’चे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ म्हणाले.

सीआयडी चौकशी करा 
वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या तोडफोड प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजाला यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही तोडफोड उद्योगांची नसून, संपूर्ण शहराचीच असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा निषेध केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha reservation agitation attacker no job MIDC