#MarathaKrantiMorcha हुतात्मा काकासाहेबांचे भाऊ नोकरीत रुजू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 August 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेले कानडगावचे (ता. गंगापूर) काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश हे सोमवारी (ता. सहा) नोकरीत रुजू झाले आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या रघुनाथनगर येथील न्यू हायस्कूलमध्ये ते लिपिक म्हणून काम करणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी काकासाहेबांनी कायगाव टोका (ता. गंगापूर) येथील पुलावरून गोदावरीत उडी घेऊन जीव दिला. आरक्षणासाठी हा पहिला बळी ठरल्याने सरकारने 25 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीसह कुटुंबातील एकाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर काकासाहेबांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या आमदार सतीश चव्हाण यांनी मशिप्र मंडळात लिपिक पदासाठीची ऑफर अविनाश यांना देऊ केली होती. कानडगाव ते रघुनाथनगर हे अंतर केवळ तीन किलोमीटरचे आहे. शासकीय अनुदानित शाळेत नोकरी मिळत असल्याने अविनाश यांनीही राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनाची वाट न पाहता, मशिप्रची ऑफर स्वीकारली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha Kakasaheb Shinde Brother Service