मराठा समाजाला आरक्षण हे बलिदान देणाऱ्या बांधवांचे यश : विनोद पाटील

राजेभाऊ मोगल 
Thursday, 29 November 2018

औरंगाबाद  : मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण म्हणजे बलिदान देणाऱ्या तरुणांना खरी श्रद्धांजली आहे. हे आरक्षण म्हणजे रस्त्यावर झेंडा घेऊन उतरलेल्या प्रत्येक बांधवांचे यश असल्याचे मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्‍त केले.

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील आंदोलनासोबतच न्यायालयीन लढाईसाठी पाटील यांचा पुढाकार राहिलेला आहे. गुरुवारी (ता.29) मुळ आरक्षणाला धक्‍का न लावता तामिळनाडूच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यात करण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी हा आराखडा सभागृहात सादर केला. त्यानंतर आरक्षणासाठी विधेयकही मांडले. या विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजुरी देण्यात आली. यानंतर पाटील यांनी मराठा समाज बांधवांचे अभिनंदन तसेच न्यायालय, सरकार व सर्व विरोधी पक्षाचे आभारही व्यक्‍त केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The success of the people who sacrificed the reservation for Maratha community: Vinod Patil