Maratha Kranti Morcha: युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

बदनापूर (जि. जालना) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बदनापूर तहसीलसमोर बुधवारी सायंकाळी एकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. संदीप जगन्नाथ भडांगे (वय 32, गोकुळवाडी, ता. बदनापूर) असे या आंदोलकाचे नाव असून, त्याच्यावर जालन्यात उपचार सुरू आहेत.

बदनापूर तहसीलसमोर नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा बुधवारी सायंकाळी सातदरम्यान समारोप झाला. येथे मंडप काढण्याचे काम सुरू असताना, मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा देत संदीप भडांगे यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मोर्चाच्या समन्वयकांनी त्याला तत्काळ बदनापूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. पुढे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार त्याला जालन्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, अशी माहिती मोर्चाचे समन्वयक राजेश जऱ्हाड यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth suicide trying for maratha reservation