शेतकऱ्यांनो....खरीप बियाणे हवंय? फोन, व्हाटस अपवरही करा नोंदणी, आजपासून विक्रीस सुरवात

सुषेन जाधव
Friday, 29 May 2020

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत खरीप बियाणे परभणी येथून औरंगाबादेतील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र येथे पोचले. काही दिवसांपासून बियाणे आणण्यास आधी लॉकडाउन तर नंतर तांत्रिक अडचणी येत होत्या. मॉन्सून येण्यास आठ ते दहा दिवस बाकी असले तरी शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांची तयारी सुरू झाली आहे. आज शुक्रवारी (ता.२९ मे) सकाळी नऊ वाजता विभागीय कृषी सहसंचालक डाॅ. डी. एल. जाधव यांच्या हस्ते प्रत्यक्ष विक्रीस सुरवात होईल.

औरंगाबाद: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत खरीप बियाणे परभणी येथून औरंगाबादेतील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र येथे पोचले. काही दिवसांपासून बियाणे आणण्यास आधी लॉकडाउन तर नंतर तांत्रिक अडचणी येत होत्या. मॉन्सून येण्यास आठ ते दहा दिवस बाकी असले तरी शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांची तयारी सुरू झाली आहे. आज शुक्रवारी (ता.२९ मे) सकाळी नऊ वाजता विभागीय कृषी सहसंचालक डाॅ. डी. एल. जाधव यांच्या हस्ते प्रत्यक्ष विक्रीस सुरवात होईल.

हेही वाचा- महत्त्वाची बातमी: कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन....

या परिस्थितीत बियाणे औरंगाबादेत दाखल झाल्याने शेतकऱ्यांना परभणीला जाण्याचा फेरा वाचणार असून, वेळेतही बचत होणार आहे. विस्तार केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी सांगितले, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे बियाणे परभणीहून मागविण्यात येते. आजवर जवळपास ९७ शेतकऱ्यांनी साधारण २० क्विंटलहून अधिक बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. अजूनही शेतकऱ्यांनी ९४२०४०६९०१ या क्रमांकावर फोन करून किंवा व्हॉट्सॲपवर खरीप बियाण्याची मागणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बियाण्यांचा आहे समावेश
खरीप बियाण्यामध्ये तुरीचे बीडीएन ७११ हे वाण प्रति बॅग सहा किलो या प्रमाणात ३० क्विंटल (पाचशे बॅगा) उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय सोबत मूग बीएम २००३-०२ हे वाण सहा किलोची प्रतिबॅग अशा ८५ बॅगा; तसेच खरीप सुधारित ज्वारी परभणी शक्ती प्रति चार किलोची बॅग अशा १२५ बॅगा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आगाऊ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी २९ मे रोजी सकाळी नऊपासून प्रत्यक्ष विक्रीसाठी सुरवात होणार असल्याचेही श्री. ठोंबरे म्हणाले. या उपक्रमासाठी सहयोगी संचालक डॉ. सु. बा. पवार, विभागीय कृषी सहसंचालक डी. एल. जाधव, डाॅ. के.टी. जाधव, डाॅ. किशोर झाडे, लक्ष्मण शिंदे यांच्यासह विद्यापीठ प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

शेतकऱ्यांनो, सर्वांनाच येण्याची गरज नाही
लॉकडाउनच्या काळात गर्दी टाळत फिजिकल डिस्टन्सिंग पाळून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे एका गावातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी एकाच व्यक्तीद्वारे बियाणे मागणी केल्यास संबंधित शेतकऱ्याने वाहनाची सोय करून बियाणे घेऊन जावे असेही श्री. ठोंबरे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kharip Seed Selling Starts Aurangabad News