प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन

अतुल पाटील
शनिवार, 11 जानेवारी 2020

डॉ. शशिकांत बऱ्हाणपुरकर यांचे पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात ठेवण्यात आले होते. बऱ्हाणपूर (ता. जि : बीड) या मुळगावी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे विभाप्रमुख डॉ जयंत शेवतेकर यांनी कळविले आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख तथा प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत नागेश्वरराव बऱ्हाणपुरकर यांचे शनिवारी (ता. 11) पहाटे औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती.

डॉ. शशिकांत बऱ्हाणपुरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरवातीला त्यांनी प्राणीशास्त्र विषयात एम. एस्सी. आणि पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर मात्र, त्यांनी अमेरिकेतील मॅंचेस्टर विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

डॉ. बऱ्हाणपुरकर हे औरंगाबाद विद्यापीठात 1980 ते 2016पर्यंत कार्यरत होते. नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापक ते विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर एमजीएममध्ये उपचार सुरु होते. आज पहाटे पावणे पाचच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात सुवर्णा पाटील या बहीण आहेत. हिंदी विभागाचे माजीप्रमुख डॉ माधव सोनटक्के यांचे ते मेहुणे होत.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

डॉ. शशिकांत बऱ्हाणपुरकर यांचे पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात ठेवण्यात आले होते. बऱ्हाणपूर (ता. जि : बीड) या मुळगावी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे विभाप्रमुख डॉ जयंत शेवतेकर यांनी कळविले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sashikant Barhanpurkar Passes Away