Coronavirus LIVE : औरंगाबादमध्ये ३० नवे रुग्ण, 77 जण कोविडमुक्त

23 New Cases Of COVID-19 in in Aurangabad
23 New Cases Of COVID-19 in in Aurangabad

औरंगाबाद :  शहरात कोविड-१९ चे रुग्ण वाढतच आहेत. काल (ता. १५ मे) दिवसभरात तब्बल ९३ रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर आज (ता. १६ मे) सकाळी ५३ रुग्ण वाढले असून, एकूण आकडा ८७२ वर पोचला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरात आठ मे रोजी १०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर काल दिवसभरात ९३ रुग्ण वाढले, तर चौघा जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (तीन),  हनुमान चौक, चिकलठाणा (एक), रामनगर (एक), एमआयडीसी (एक), जालाननगर (एक), संजय नगर, क्रमांक सहा (तीन), सादातनगर (चार), किराडपुरा (एक), बजाजनगर (एक), जिनसी रामनासपुरा (एक), जुना मोंढा, भवानीनगर, गल्ली क्रमांक पाच (एक), जहागीरदार कॉलनी (एक), आदर्श कॉलनी (एक), रोशन गेट (एक), अन्य (सात) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १७ पुरुष आणि १३ महिला रुग्णांचा समावेश आहे. 

 नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 
 
२४ तासांत चौघांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमाननगर येथील ७४ वर्षीय, बायजीपुरा येथील ७० वर्षीय, शहानूर मियाँ येथील ५७ वर्षीय आणि हिमायतनगर येथील ४० वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळविले आहे. 

कंन्टेनमेंट झोनमधून वाढले  ८० टक्के रुग्ण
गल्ल्यांमध्ये नागरिकांचे एकमेकांच्या घरात जाणे-येणे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकाच भागात रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंतची आकडेवारी पाहता १२ कंन्टेनमेंट झोनमधून ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. संजयनगर मुकुंदवाडी येथील एका वाड्यात तब्बल ६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
 
काल दिवसभरात 77 जण कोरोनामुक्त 
काल दिवसभरात घाटी रुग्णालयातील एकूण 10 जण कोविड-१९ तून बरे झाले. यात आठ जण किलेअर्क, एक जण उस्मानपुरा, आणि एक रुग्ण दौलताबाद यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. कानन येळीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातून १७ रुग्णांशिवाय आणखी १० जण कोरोनातून बरे झाले. यात जयभीमनगर येथील दोन पुरुष, जोन महिला, चार अल्पवयीन मुलींना सुटी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. महापालिकेच्या कोविड सेंटरमधील ४० जणांना सुटी झाली, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
 
कोरोना मीटर

  • उपचार सुरू असलेले रुग्ण - ५४०
  • बरे झालेले रुग्ण - ३०७
  • मृत्यू - २५

एकूण रुग्ण - ८७२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com