Coronavirus LIVE : औरंगाबादमध्ये ९०० रुग्ण, आज या भागात शिरकाव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

आज दुपारी २८ रुग्णाची भर पडली असून, एकूण आकडा ९०० वर पोचला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

औरंगाबाद :  शहरात कोरोनाच्या रुग्णवाढीचे मीटर वाढतच चालले आहेत. काल दिवसभरात ९३ रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर आज (ता. १६ मे) सकाळी ३० तर दुपारी २८ रुग्णाची भर पडली असून, एकूण आकडा ९०० वर पोचला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरात आठ मे रोजी १०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता. १५) दिवसभरात ९३ रुग्ण वाढले, तर चौघा जणांचा मृत्यू झाला. 
शनिवारी सकाळी एमजीएम मेडिकल कॉलेज - ३,  हनुमान चौक, चिकलठाणा -१, रामनगर-३, एमआयडीसी-१, जालाननगर -१, संजयनगर, लेन नं. सहा-३, सादानगर -४, किराडपुरा - १, बजाजनगर-१ जिनसी रामनासपुरा - १, जुना मोंढा, भवानीनगर, गल्ली नं. पाच-१, जहागीरदार कॉलनी-१, आदर्श कॉलनी-१, रोशनगेट-१, अन्य ठिकाणचे ७ असे ३० रुग्ण वाढले. त्यानंतर दुपारी चारनंतर २८ नव्या रुग्णांची भर पडली. 

 नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

दुपारी कैलासनगर -१, चाऊस कॉलनी-१,  मकसूद कॉलनी-२, हुसेन कॉलनी -४, जाधववाडी-१, न्यू बायजीपुरा, गल्ली नं. तीन- १, एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको- १ कटकट गेट -१, बायजीपुरा -१० अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको-२, लेबर कॉलनी-१, जटवाडा-१, राहुलनगर-१ आणि जलाल कॉलनी -१ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश आहे. आज सकाळपासून आतापर्यंत एकूण ५८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. 

औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  
 
२४ तासांत चौघांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमाननगर येथील ७४ वर्षीय, बायजीपुरा येथील ७० वर्षीय, शहानूर मियाँ येथील ५७ वर्षीय आणि हिमायतनगर येथील ४० वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळविले आहे. 
 
कंन्टेनमेंट झोनमधून वाढले  ८० टक्के रुग्ण
गल्ल्यांमध्ये नागरिकांचे एकमेकांच्या घरात जाणे-येणे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकाच भागात रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंतची आकडेवारी पाहता १२ कंन्टेनमेंट झोनमधून ८० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. संजयनगर मुकुंदवाडी येथील एका वाड्यात तब्बल ६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
 
काल दिवसभरात 77 जण कोरोनामुक्त 
काल दिवसभरात घाटी रुग्णालयातील एकूण 10 जण कोविड-१९ तून बरे झाले. यात आठ जण किलेअर्क, एक जण उस्मानपुरा, आणि एक रुग्ण दौलताबाद यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. कानन येळीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयातून १७ रुग्णांशिवाय आणखी १० जण कोरोनातून बरे झाले. यात जयभीमनगर येथील दोन पुरुष, जोन महिला, चार अल्पवयीन मुलींना सुटी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. महापालिकेच्या कोविड सेंटरमधील ४० जणांना सुटी झाली, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
 
कोरोना मीटर

  • उपचार सुरू असलेले रुग्ण - ५६८
  • बरे झालेले रुग्ण - ३०७
  • मृत्यू - २५

एकूण रुग्ण - ९००
             


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 58 New Cases Of COVID-19 in in Aurangabad