Video पाहा: रुग्णांची हेळसांड!! एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची रात्री अकराला घाटीत धाव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल सवाल करण्यासाठी घाटी रुग्णालयात एमआयएमचे माजी नगरसेवक पदाधिकारी आणि सुमारे पन्नास  कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २६) रात्री अकरा वाजता धाव घेतली. घाटी व्यवस्थापनाशी चर्चेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले गेले असे नासेर सिद्दीकी यांच्याकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल सवाल करण्यासाठी घाटी रुग्णालयात एमआयएमचे माजी नगरसेवक पदाधिकारी आणि सुमारे पन्नास  कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. २६) रात्री अकरा वाजता धाव घेतली. घाटी व्यवस्थापनाशी चर्चेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले गेले असे नासेर सिद्दीकी यांच्याकडून सांगण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात घाटी येथे भरती झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबत नातेवाईकांना माहिती दिली जात नाही. रुग्णाचा मृत्यू झाल्यासच सांगण्यात येते. रुग्ण चार चार दिवस ऍडमिट असतात, पण त्यापूर्वी माहिती दिली जात नाही.

हेही वाचा- टेस्टिंग अन..कोरोनाबाधितांची संख्याही मंदावली, औरंगाबाद @१३६० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

याबाबत विचारणा करण्यासाठी आणि काही मागण्या घेऊन एमआयएमचे माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी,  शहराध्यक्ष शेख अहमद, माजी नगरसेवक इर्शाद हाजी यांच्यासह सुमारे पन्नास कार्यकर्ते रात्री अकरा ते साडे अकरा दरम्यान घाटी रुग्णालयात आले.

नासिर सिद्दिकी आणि शिष्टमंडळाने घाटी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. यानंतर नासेर सिद्दिकी यांनी सांगितले की रुग्णांच्या नातेवाईकांसाठी घाटी रुग्णालयात व्यवस्था करण्यात येणार असून रुग्णांची नातेवाईकांना दुरून भेटू दिले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले. घटनेची गांभीर्य ओळखून आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घाटी रुग्णालयात उपस्थित होते.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIMIM Leaders, Activist in Ghati Hospital Aurangabad News