Corona Impact: अजिंठा लेणीत पर्यटकांचा संमिश्र प्रतिसाद; व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

jarandi 2.jpg
jarandi 2.jpg

जरंडी (औरंगाबाद) : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर (ता.31) गुरुवारी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. केवळ 31 डिसेंबरच्या एकारात्रीसाठी फर्दापूर येथील पर्यटन विकास महामंडळाच्या दोन्ही पर्यटक निवास्थानांना सुमारे वर्षभरानंतर समाधानकारक बुकिंग झाल्याचे दिसले आहे. तर येथील खाजगी हॉटेल्स व लॉजिंगला ६० ते ७० टक्के बुकिंग मिळाल्याचे दिसून आल्याने ही बाब हॉटेल व लॉजिंग व्यवसायिकांसाठी दिलासादायक ठरले आहे. तरी येथील व्यापार संकुलनातील पर्यटन पूरक व्यवसायिकांच्या पदरी मात्र पुन्हा एकदा निराशाच पडल्याचे दिसून आले आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी दरवर्षी ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देशी-विदेशी पर्यटकांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल होताना दिसून येते. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी या काळातील पर्यटन हंगामात येथील पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस लाभल्याचे दिसून येते. मात्र या वर्षी कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण जग धास्तावलेले असतानाच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचे आगमन झाले व याचा विपरीत परिणाम अजिंठा लेणीतील पर्यटन व्यवसायावर झाला. या पार्श्वभूमीवर ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये अजिंठा लेणीकडे पर्यटकांनी पाठ फिरविल्याने येथील पर्यटन व्यवसायिकांचा पूर्णपणे हिरमोड झाल्याचे दिसून आले होते.

दरम्यान ख्रिसमसच्या तुलनेत नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी अजिंठालेणीला संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी पर्यटन विकास महामंडळाच्या अजिंठालेणी टि.पॉइंट व फर्दापूर येथील पर्यटक निवास्थानांना पसंती दर्शवल्याने येथे 31 डिसेंबरसाठी सुमारे वर्षभरानंतर याठिकाणी समाधानकारक बुकिंग झाल्याचे तर खासगी हॉटेल्स व लॉजिंगमध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत बुकिंग झाल्याने ही बाब या व्यवसायिकांसाठी काही अंशी दिलासादायक ठरली आहे.

मात्र, नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांनी अजिंठालेणीत जाणे टाळल्याने 31 डिसेंबर रोजी पर्यटकांनी अजिंठालेणीत संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. परिणामी येथील व्यापार संकुलनातील व्यवसायिकांच्या पदरी मात्र पुन्हा एकदा घोर निराशाच पडल्याचे दिसून आले आहे.

अजिंठालेणी टि.पॉइंट येथील पर्यटक निवासस्थान हाऊसफुल्ल झाले असून फर्दापूर येथील पर्यटक निवास्थानात समाधानकारक बुकिंग झाली असून ही बाब पर्यटन व्यवसायासाठी दिलासा दायक ठरली आहे.
- रामदास क्षीरसागर, व्यवस्थापक एमटीडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com