मद्यपींवर भरारी पथकाची नजर

प्रकाश बनकर
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच निरीक्षक आणि एक भरारी पथकासह सर्व कर्मचारी थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. विमा परवाना मद्य पिणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळत त्यांच्या कारवाईसाठी ही टीम तयार झाली आहे. यासाठी विशेष पथकेही तयार करण्यात आली आहेत.

औरंगाबाद : नव्या वर्षांच्या स्वागतासाठी प्रत्येकाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अनेक जणांनी वेगवेगळे प्लॅन तयार केले आहेत. असे असले तरी विनापरवाना मद्य पिणाऱ्यांना ही थर्टी फर्स्ट महागात पडू शकते. कारण राज्य उत्पादक शुल्क विभाग अशा मद्यपींवर करडी नजर ठेवून आहे. राज्य उत्पादन शुल्कबरोबर पोलिसांचीही नजर अशा मद्यपींवर असणार आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच निरीक्षक आणि एक भरारी पथकासह सर्व कर्मचारी थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. विमा परवाना मद्य पिणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळत त्यांच्या कारवाईसाठी ही टीम तयार झाली आहे. यासाठी विशेष पथकेही तयार करण्यात आली आहेत. यातील काही टीम या साध्या वेशातही शहर आणि परिसरात गस्त घालणार आहेत. या विभागाच्या मदतीला पोलिसांचाही फौजफाटा तयार असणार आहे. 

हेही वाचा : थर्टी फर्स्ट हॉटेल,  ढाबे होणार हाऊसफुल्ल 

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे थर्टी फर्स्टनिमित्ताने एक ते दोन दिवसांचा मद्य पिण्याचा परवाना मिळतो. दरवर्षी अनेकजण रीतसर हा परवाना काढत असतात. अनेकजण हा परवाना न काढता दारू रिचवत असतात. अशांना पकडून त्यांच्यावर करावाई करण्यात येत असते. यंदाही अशा प्रकारे विनापरवागनी दारू विक्री, तसेच विनापरवानगी दारू पिताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. 

हेही वाचा : पोलिसच जाणार तक्रारदारांकडे (कुठे ते वाचा)

पोलिसांचा तगडा बंदोबस्त 
नवीन वर्षांच्या अनुषंगाने होणाऱ्या पार्ट्या आणि कार्यक्रमावरन पोलिसांचे विशेष लक्ष आहे. याच दरम्यान विदेशी मद्याची चोरटी वाहतूक आणि दारु पिऊन वाहन चालणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसही सज्ज झाले आहे. पोलिसांतर्फे दारू पिऊन वाहन चालणाऱ्यांना विशेष लक्ष ठेवले आहे. एवढे नाही तर प्रत्येक पोलिसांच्या हद्दी होणाऱ्या पार्ट्या आणि मधून गैर प्रकार होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. तळीरामवर विशेष लक्ष ठेवून आहे. 

हेही वाचा : औरंगाबाद उपमहापौर पदावर शिवसेनेचे जंजाळ 

नियमावच्या बाहेर असणाऱ्यांवर पोलिसांतर्फे तात्काळ कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांची विशेष भरारी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथके फिरतीवर राहणार आहे. त्यानुसार करवाई करणार आहे. भरारी पथकासह साध्या वेशातही पोलिस ग्रस्त घालणार असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcolics Under Polic Action Squad Servilance