esakal | ना जीवाची हमी, ना पोटाची व्यवस्था, अंगणवाडी सेविकांची व्यथा..!
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

कोणत्याही सुरक्षासाधनाशिवाय, विमा कवचाशिवाय कोरोनाकाळात कामे करावे लागत आहेत. सामाजिक कामे करण्यासाठी आम्ही बांधील आहोत मात्र शासनाने आमच्या सुरक्षेची तरी जबाबदारी घ्यावी आणि आमचे मानधन वेळेवर द्यावे अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ना जीवाची हमी, ना पोटाची व्यवस्था, अंगणवाडी सेविकांची व्यथा..!

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : आधीच तुटपुंजे मानधन, त्यात गेल्या दोन महिन्यापासून काही अंगणवाडी सेविकांना उशीरा का होईना मानधन मिळाले तर काहींना गेल्या दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने या कोरोनायोद्ध्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशाही परिस्थितीत त्याना कोणत्याही सुरक्षासाधनाशिवाय, विमा कवचाशिवाय कोरोनाकाळात कामे करावे लागत आहेत. सामाजिक कामे करण्यासाठी आम्ही बांधील आहोत मात्र शासनाने आमच्या सुरक्षेची तरी जबाबदारी घ्यावी आणि आमचे मानधन वेळेवर द्यावे अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

कोरोनाकाळात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने अंगणवाडी सेविका, मदतनिसही काम करत आहेत. मात्र जिल्ह्यातील काही भागातील अंगणवाडी सेविकांना एप्रिलचे मानधन पाच सहा दिवसांपुर्वी तर मे महिन्याचे मानधन मंगळवारी (ता.२३) जून संपता संपता मिळाले. अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे जून संपत आला तरी एप्रिलपासूनचे मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

 अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी काम करणारे आयटकचे प्रा. राम बाहेती यांनी सांगीतले, की अंगणवाडी सेविकांना कोणतेही विमा संरक्षण दिले नाही, त्यांना कोरोनाकाळात काम करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांना दिला जातो त्याप्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता दिलेला नाही. त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार. त्यांना विमा कवच द्यावे, प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे आणि त्यांचे थकीत मानधन तातडीने दिले पाहीजे अशी मागणी केली. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

गंगापुर येथील एका अंगणावाडी सेविकेने सांगीतले, दोन महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. कोणतेही सुरक्षा साधने नाहीत किंवा प्रोत्साहनपर अनुदान दिले जात नाही. सामाजिक बांधिलकीची कामे करण्यासाठी आम्ही तयार आहोत पण आमच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  


साधा मास्कदेखील मिळेना 

पैठण तालूक्यातील पिंपळवाडी येथील एका अंगणवाडी सेविकेने सांगीतले आम्हाला साधा मास्कदेखील दिलेला नाही. मात्र थर्मल गनने लोकांचे तापमान मोजत फिरावे लागते. त्यात मोबाईलवरून आम्हाला कामे करण्याची सक्ती करण्यात आली आहे. ते सतत खराब होतात आणि ते दुरूस्तीसाठी औरंगाबादलाच जावे लागते. मानधन मिळते आठ नऊ हजार आणि मोबाईल खराब झाला की त्याला अडीच तीन हजार रूपये खर्च करावा लागतो अशी व्यथा मांडली.