मुनगंटीवारांचे वक्‍तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने - अशोक चव्हाण 

राजेभाऊ मोगल
Thursday, 30 January 2020

भाजप अजूनही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्‍तव्य श्री. मुनगंटीवार यांनी नांदेड येथे केले होते. त्याचा श्री. चव्हाण यांनी गुरुवारी (ता.30) चांगलाच समाचार घेतला. 

औरंगाबाद : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या महाविकास आघाडीबद्दलच्या बोलण्याला तसा काहीही अर्थ नाही. आमचे तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. सगळ चांगलचं चाललेलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांचे "मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहायची जी इच्छा आहे. ती चालू द्या, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

हेही वाचा : क्रिकेटपटू अझरुद्दीनवरील  गुन्हा रद्द करण्याच्या हालचाली 

भाजप अजूनही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्‍तव्य श्री. मुनगंटीवार यांनी नांदेड येथे केले होते. त्याचा श्री. चव्हाण यांनी गुरुवारी (ता.30) चांगलाच समाचार घेतला. 

अशोक चव्हाण म्हणाले, ते काहीही म्हणाले तरी त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. तसे काही होण्याची सुतराम शक्‍यता नाही. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी मुख्य अभियंता कार्यालयात नांदेड जिल्ह्यातील विभागप्रमुखांसोबत चर्चा केली. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजना बैठकीसाठी ते उपस्थितीत राहणार आहे.

क्लिक करा : किशनचंद तनवाणी यांची नाराजी दूर होणार का ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना आरखड्यावर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थितीत राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok chavan sudhir mungantiwar statement about government aurangabad news