औरंगाबादेत कोरोनासुराचा कहर; एकाच दिवसात २६३ जण बाधित, शहरात १४९,  ग्रामीण भागात ११४ पॉझिटिव्ह  

File Photo
File Photo
Updated on

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनासुराचा कहर वाढत असुन बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बुधवारी (ता. २४) २०० जण बाधित झाले. त्यानंतर आज (ता. २५) तब्बल २६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील १४९ आणि ग्रामीण भागातील ११४ रुग्णांचा समावेश आहे. यावरुन लागण मोठ्या झपाट्याने होत असल्याचे दिसून येत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४ हजार २९९ झाली आहे. यापैकी २ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २३२ जणांचा कोरोनासह व्याधींनी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता १ हजार ७७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

बाधीतांमध्ये ९४ महिला, १६९ पुरुष
आज एकुण २६३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील १४९ आणि ग्रामीण भागातील ११४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आज सकाळी आढळुन आलेल्या २६३ रुग्णांमध्ये शहरातील १४९ रुग्ण व ग्रामीण भागातील ११४ जण बाधित आहेत. या सर्व बाधीतांमध्ये ९४ महिला आणि १६९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद शहरात आढळलेले १४९ रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) -
समता नगर (१), चिकलठाणा (१),नुतनकालनी (१), घाटी परिसर (१), संजयनगर मुकुंदवाडी (१), अंगुरीबाग (६), श्रीकृष्ण नगर, टिव्ही सेंटर (१), हिनानगर चिखलठाणा (१), सईदा कॉलनी (१), केशरसिंग पुरा (४), अरिहंत नगर (१), व्यंकटेश कॉलनी (१), जुने पडेगांव (४), पडेगांव (९), नक्षत्रवाडी (१),गजाजन कॉलनी (९), शिवाजी मंडी, नारेगांव (१), इंदिरा नगर, गारखेडा (२), पुंडलीक नगर (१), संत तुकाराम नगर एन-२ सिडको (३), आझाद चौक (१), शिवशंकर कॉलनी (५), गजानन नगर (१), उत्तम नगर (१), विठ्ठल नगर (१), जाधववाडी (१), राजे संभाजी नगर, जाधववाडी (२), जय भवानी नगर (७), एन-१२ शिवछत्रपती नगर (१), बंजारा कॉलनी (१), जिजामाता कॉलनी (२), नवजीवन कॉलनी (२), न्यु गजानन कालनी गारखेडा (१), एन-६ सिडको (२), चिखलठाणा, बौध्दवाडा (१), अन्य (२), एन-११ मयुरनगर (१), सी-८ सिडको (१), रामनगर (१), एन-५ सिडको (१), मुजीब कॉलनी (१), द्वारका नगर (१), संभाजी नगर, एन-६ सिडको (१), शिवाजी नगर (२), हडको, एन-२ (१), एन-८ सिडको (२), नेहरु नगर, कटकट गेट (१), रामनगर एन-२ सिडको, (१), मुकुंदवाडी (१), स्वामी विवेकानंद नगर, एन-१२ हडको (१), नागेश्वरवाडी (१), उदय कॉलनी (१), न्यु हनुमान नगर (१), गारखेडा परिसर (१), समर्थ नगर (४), भारतमाता नगर (१), नागसेन कॉलनी (२), कॅनॉट प्लेस (६), एन-५ (१), सिध्दार्थ नगर (१), श्रीकृष्ण नगर, एन-९(१), जयभवानी नगर (२), कैलास नगर (३), चिखलठाणा (१), आनंद नगर (१), बजाज नगर (१), जाधववाडी (१) सिल्क मिल कॉलनी (१), भारत माता नगर (१), गल्ली  क्रमांक नऊ, हुसेन कॉलनी (१),  गादिया पार्क (१),  पहाडसिंगपुरा (१),  मयुर पार्क (१),  जयसिंगपुरा (२),  मनपा परिसर (१),  एसटी कॉलनी गारखेडा (१), देवगिरी अपार्टमेंट, जाधववाडी (१),  जय भवानी नगर (१),  विनायक नगर, देवळाई (१), हिंदुस्थान आवास (१), शिवाजी नगर (१), कबीर नगर (१), बारी कॉलनी  (१), राज  बाजार (१), शहागंज (१),  जय भावानी नगर (३), रोशन गेट (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागात आज आढळलेले ११४ रुग्ण -
सावता नगर, लक्ष्मी माता चौक, राजंणगांव (१), शिवालय चौक, बजाजनगर (१), बजाजनगर (१२), सम्यक गार्डन शेजारी, वाळुज (१), दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर (१), वडगांव कोल्हाटी , बजाजनगर (१), करमाड (१),  हिवरा (२),   पांढरी पिंपळगाव (१), पळशी (४), सिडको महानगर (८), जयभवानी चौक, बजाज नगर (३), यशवंती हाऊसिंग सोसा. (५), राजा हंसचंदा सोसा. बजाज नगर (२), मीराताई कालनी साई मंदिराजवळ, बजाजनगर (१), गुलमोहर हाऊ. सोसा, बजाज नगर (१), मातोश्री हाऊ सोस, बजाजनगर (१), जागृती हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर (१),  लोकमान्य चौक, बजाज नगर (१),  बीसएनएल गोदामाशेजारी (१), आंबेडकर चौक, बजाजनगर (१), शिवालय कॉलनी, बजाजनगर (१), व्दारका नगर, बजाज नगर  (१), वृंदावन हॉटेल शेजारी (१), सप्तश्रृंगी हौ.सोसा., बजाज नगर (६), साई नगर, बजाज नगर (१), गणेश हॉ. सो. बजाज नगर (१), तोरणा हौ.सोसा. बजाज नगर (२), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (१), अश्वमेघ हौ.सोसा.बजाज नगर (१), सह्याद्री हौ. सोसा. बजाज नगर (१), अर्बन व्हॅली (२),  घृष्णेश्वर हॉस्पिटल परिसर, बजाज नगर (१), दत्तकृपा हौ.सो., बजाज नगर (३), दिग्विजय हौ.सो.बजाज नगर (१), शिवालय हौ.सो., बजाज नगर (३), श्रीराम प्लाझा, बजाज नगर (३),शेवता फुलंब्री (१), समर्थ नगर (२), जयसिंग नगर (५), लासुर नाका (३), शिक्षक  कॉलनी (१), पदमपुर (१), मारवाडी गल्ली (१), प्रगती कॉलनी (१), फुले नगर (१), गोदावरी कॉलनी (१), गलनिंब, गंगापुर (१), माऊली नगर, गंगापुर (२),  बजाज नगर, गंगापुर (१), तुर्काबाद, गंगापुर (२), मांजरी, गंगापुर (१), वाळुज, गंगापुर (३), रघुनाथ कॉलनी (१), वडगाव (१),  बजाज नगर (१), अज्मशाहीपुरा खुलताबाद (४), खुलताबाद (१) रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण      - २२९३
उपचार घेणारे रुग्ण - १७७४ 
एकुण मृत्यू            - २३२
-------------------------
आतापर्यंतचे बाधीत - ४२९९
------------------------- 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com