
चालकाने त्याला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक दाबले. जसे ब्रेक दाबले तशी रिक्षा उलटली
औरंगाबाद: मुलाच्या उपचारासाठी अकोल्याहून आलेल्या दांपत्याची रिक्षा उलटल्याने तीन वर्षीय चिमुकला ठार झाला. तर अन्य तिघे जखमी झाले. हा भीषण अपघात विजयनगर चौकात मंगळवारी (ता.नऊ) सायंकाळी सहा वाजता घडला. विराज श्रीकृष्ण बांगर (वय तीन) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
या अपघातात श्रीकृष्ण गजानन बांगर, शिल्पा श्रीकृष्ण बांगर आणि नर्मदा मनोहर रणसिंघे हे जखमी झाले. श्रीकृष्ण आणि शिल्पा बांगर यांचा मुलगा विराज याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले होते. त्याच्या अधिक उपचारासाठी बांगर दांपत्य मंगळवारी अकोला येथून औरंगाबादेत आले. ते सिडको बसस्थानकावर उतरून रिक्षाने शहानूरमियाँ दर्गा भागात राहणाऱ्या नातेवाइकांकडे निघाले.
वाळूज येथील भाजी मंडई हटवण्यावरून भाजप आक्रमक; आंदोलकांना पोलिसांनी घेतले...
त्याच रिक्षात नर्मदा रणसिंघे यादेखील बसलेल्या होत्या. त्यांची रिक्षा सिडको बसस्थानक येथून कामगार चौक, जयभवानीनगर चौक, पुंडलिकनगर रोडमार्गे विजयनगर, सूतगिरणी चौकातून शहानूरमियाँ दर्गा चौकाकडे जाणार होती.
पाकिस्तानातून परतलेल्या हसीना यांचा मृत्यू; मृत्यूपूर्वी नोंदविला होता जबाव
परंतु, विजयनगर चौकात त्यांच्या रिक्षाला रस्ता ओलांडणारा एक मुलगा आडवा पळाला. चालकाने त्याला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक दाबले. जसे ब्रेक दाबले तशी रिक्षा उलटली. या भीषण अपघातात रिक्षाखाली दबून विराज गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद पुंडलिकनगर ठाण्यात करण्यात आली आहे.
(edited by- pramod sarawale)