esakal | बीड बायपास बनतोय मृत्यूचा सापळा, दुचाकी-ट्रकच्या अपघातात एक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident news.

हा अपघात सोमवारी दुपारी बीड बायपावरील निशांत पार्कसमोर घडला आहे  

बीड बायपास बनतोय मृत्यूचा सापळा, दुचाकी-ट्रकच्या अपघातात एक ठार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून बीड बायपासवर अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामध्ये विनाकारण लोकांचा नाहक बळी जात आहे. सोमवारी पितापुत्र दुचाकीवरुन जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात वडीलांचा जागीच मृत्यू झाला.

हा भीषण अपघात बीड बायपासवरील निशांत पार्कसमोर सोमवारी (ता.१५) दुपारी घडला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून सातारा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. अश्रुबा भीमराव राऊत (६५, रा. पोखरी, ता.जि. बीड) असे मृताचे नाव आहे.

लोकांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे, असे सुसाईड नोट लिहून औरंगाबादचा...

याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अश्रूबा राऊत यांचा मुलगा विष्णू हा औरंगाबादेत राहतो. त्याला भेटण्यासाठी त्याचे वडील अश्रूबा शहरात आले होते. दरम्यान दोघे पिता पुत्र दुचाकीवर (एमएच ३९, क्यू ७८५३) बीड बायपास रस्त्याने एमआयटीकडे जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच २० सीटी २६६६) राऊत यांच्या दुचाकीला ठोकरले.

यामध्ये अश्रूबा राऊत यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला. दरम्यान ट्रकचालक पसार झाला होता असेही श्री. माळाळे म्हणाले. 

(edited by- pramod sarawale)