
एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याला मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजु शिंदे यास पैठण येथील शासकीय रुगण्लयात दाखल केले.
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील धनगाव फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वाहेगाव (ता.पैठण) येथील तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.२०) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. राजू कडूबाळ शिंदे (वय ३५, रा.वाहेगाव, ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे.
वाचा - मोबाईलवर मोठ्याने बोलू नको म्हणणे बेतले जीवावर, काठी व दगडाने क्रूरपणे तरुणाचा खून
या बाबत मिळलेल्या माहितीनुसार राजु कडुबाळ शिंदे हा दुचाकीवरुन (एमएच २० सीडब्ल्यू १७७८) बिडकीन येथुन वाहेगावकडे जात असताना पैठण-औंरगाबाद मुख्य रस्त्यावरील धनगाव फाट्यावर अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात राजू शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या बाबतची माहिती एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याला मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजु शिंदे यास पैठण येथील शासकीय रुगण्लयात दाखल केले. पुढील तपास एमआयडीसी पैठण पोलिस करित आहे.
संपादन - गणेश पिटेकर