मुख्यमंत्री साहेब..! 'मी सुद्धा केली आरती, माझ्यावर गुन्हा दाखल करा’

प्रकाश बनकर
Wednesday, 12 August 2020

भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठवताहेत २५ हजार पत्रे अन् दहा हजार ई-मेल 

औरंगाबाद : ‘मीसुद्धा प्रभू श्रीरामाची आरती केली, मीसुद्धा आपल्या दृष्टीकोनातून गुन्हा केला आहे, त्यामुळे माझ्यावरही गुन्हा दाखल करा, अशा आशयाची २५ हजार पत्रे आणि दहा हजार ई-मेल भाजपतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येत आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

अयोध्येत नुकताच श्रीराम मंदिराचा भूमीपूजन सोहळा झाला. यानिमित्ताने गुलमंडी, गारखेडा येथे भाजपतर्फे श्रीरामाचे पूजन, आरती करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. चौका-चौकात आनंदोत्सव साजरा करणारे भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, प्रमोद राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

या विषयी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत भाजपने तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यातील आघाडी सरकारचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा आंदोलनास मंगळवारपासून(ता.११) सुरुवात करण्यात आली. प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रमोद राठोड, शहर सरचिटणीस कचरु घोडके, रामेश्वर भादवे, राजेश मेहता, प्रविण कुलकर्णी, संजय बोराडे, श्रीनिवास देव यांच्या उपस्थित होते. ‘मीसुद्धा प्रभु श्रीरामाची आरती केली, मी सुद्धा आपल्या दृष्टीकोनातून गुन्हा केला आहे, त्यामुळे माझ्यावरही गुन्हा दाखल करा,’’ या आशयाचे २५ हजार पत्र आणि दहा हजार ई-मेल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यास सुरुवात करण्यात आली, अशी माहिती अभियानप्रमुख राठोड यांनी सांगितले.  

Edit- Pratap Awachar

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad BJP News CM send 25 thousand letter