esakal | पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं 
sakal

बोलून बातमी शोधा

ashit kamble.jpg
  • उमरग्याच्या दोन सुपूत्रांनी मिळविले युपीएससी परिक्षेत उज्ज्वल यश. 
  • एकूरगा येथील अशित नामदेव कांबळे व जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड यांनी उज्वल यश मिळवून तालुक्याचा लौकिक वाढवला आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं 

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा : केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत एकूरगा येथील अशित नामदेव कांबळे व जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड यांनी उज्वल यश मिळवून तालुक्याचा लौकिक वाढवला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

एकुरगा येथील अशितने यापूर्वी घेण्यात आलेल्या (आय.एफ.एस.) परीक्षेत देशात ६६ वा आला होता. वडिल नामदेव कांबळे हे एस.टी. मध्ये मेकॅनिकचे काम करत होते. ते सध्या सेवानिवृत्त आहेत. आई ललीता कांबळे अंगणवाडी सेविका आहे. एका सामान्य कुटुंबातील तरुणाने हे यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे स्पर्धा परिक्षेची तयारी केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सहाव्या  प्रयत्नात त्यांनी हे यश खेचून आणले आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

अशितचे प्राथमिक शिक्षण एकुरगा येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण शिवशक्ती विद्यालयात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, अहमदपूर येथे पूर्ण झाले. बारावी नंतर पदवीसाठी पुणे येथील (vit) विश्वकर्मा इंस्टिट्युट ऑफ टेकनॉलॉजी या शिक्षण संस्थेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून ७५२ रँकने उत्तीर्ण झाले आहेत. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    

अशितवर अभिनंदनाचा वर्षाव
अशितने मिळविलेल्या अलौकिक यशाचे विविध स्तरातील व्यक्तींनी कौतूक केले आहे. मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अशितने पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी विजय वाघमारे, सुभाष सोनकांबळे, अशोक बनसोडे, महादेव पाटील, नागनाथ कांबळे, बाबुराव गायकवाड, कुमार कांबळे, तानाजी गायकवाड आदी उपस्थित होते.


२०१३ पासून स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होतो. सहाव्या प्रयत्नात हे यश मिळाले आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी माझी आय.एफ.एस. परीक्षेत निवड झाली होती, आता आय. ए. एस. परिक्षेतील निकालाने आनंदित झालो आहे. परिक्षा कठीण असल्या तरी "कष्ट हेच भांडवल " याचा मार्गच यशाकडे नेतो, याचा अनुभव आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत गुणवत्ता असते मात्र कठोर परिश्रम आणि जिद्द, चिकाटी महत्वाची आहे. 
अशित कांबळे

Edited By Pratap Awachar