चंद्रकांत खैरे म्हणतात, बागडे यांनी पक्षाच्या निर्णयानुसार निवृत्ती घ्यावी

haribhau bagade and chandrakant khaire
haribhau bagade and chandrakant khaire

औरंगाबाद: जिल्हा बँकेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढवावी अशी माझी भूमिका आहे. यात आमच्या दोन्ही मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भात माझ्याशी चर्चा केलेली नाही. पक्षाची शिस्त अनेकांना माहिती राहिलेली नसल्याचा आरोप शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी (ता.१८) पत्रकार परिषदेत केला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड यांच्या शेतकरी सहकार बँक विकास पॅनलला खैरे यांनी पाठिंबा दिला. श्री.खैरे म्हणाले, की बँकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींचे काय काम आहे? यामुळे सहकार क्षेत्रात (बँक निवडणूकीत) मी पडलो नाही. मात्र, नागरिकांच्या मदतीची माझी भूमिका पहिल्यापासून आहे. शेतकरी सहकार बँक विकास पॅनलमध्ये महाविकास आघाडीचे लोक सर्वाधिक आहेत. यात सर्वसामान्यांना संधी दिली आहे. मी अनेक संस्थांना मान्यता मिळवून देण्यासाठी मदत केली असून सर्व माझे मतदार असल्यामुळे या निवडणूकीत चमत्कार घडत बदल होईल. 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आमच्या बरोबर आल्यामुळे आमच्या पॅनेलचे वजन वाढले असल्याचे माजी आमदार सुभाष झांबड यांनी सांगितले. तर माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी फोनवरून संवाद साधत विरोधकांवर टीका केली. परिषदेला माजी आमदार नामदेव पवार, अंबादास मानकापे, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, नंदकुमार घोडेले, डॉ. पवन डोंगरे उपस्थिती होती. 

बागडे यांनी पक्षाच्या निर्णयानुसार निवृत्ती घ्यावी-
बँकेच्या निवडणुकीवरून शिवसेना नेते खैरे यांनी आमदार हरिभाऊ बागडेंवर निशाना साधला, खैरे म्हणाले, 'हरिभाऊंना जिल्हा बँक पाहिजे, दूध संघ पाहिजे, देवगिरी बँक, शाळा, कारखानाही असे सर्वच पाहिजेत. मात्र आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नियमानुसार वयाच्या ७५ वर्षानंतर निवृत्ती घ्यावी, असा टोलाही लागवला. 

कोण अंबादास दानवे? 
जिल्हा बँकेची निवडणूक पक्ष म्हणून लढवायची असती, तर पक्षाचा नेता म्हणून माझ्यावर जबाबदारी असती. मात्र या निवडणूकीत पक्ष नसतो. तुमचा विरोधात कोण, बागडे कि अंबादास दानवे, असे खैरे यांना विचारले असता, कोण आहे अंबादास दानवे? माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे का तो? हरिभाऊ माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, त्यांनी आता थांबले पाहिजे, असेही खैरे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com