esakal | कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; दुष्काळ, अतिवृष्टीने झालं होतं नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

poison

गुरूवारी सकाळी लहान भाऊ पुजाराम पाबळे शेताकडे पाणी भरण्यास गेला असता बबन बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; दुष्काळ, अतिवृष्टीने झालं होतं नुकसान

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (औरंगाबाद): शेतात पाणी भरायला गेलेल्या शेतकऱ्यांने विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केली आहे. ही घटना लोहगाव येथे गुरुवार सकाळी उघडकीस आली असून बबन रामनाथ पाबळे (वय ४५) असे त्यांचे नाव आहे.

या बाबतची आधिक माहिती अशी की बबन पाबळे हा.बुधवार (ता.२७) दुपारनंतर पाणी भरण्यास शेतात गेला होता. दुष्काळ त्यानंतर अतिवृष्टीने पिकासाठी केलेला खर्च निघत नव्हता. त्यामुळे दिवसेंदिवस आर्थिक चणचण भासत होती. कर्ज कसं फेडावं या विवेचनात विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केली आहे.

'वडेट्टीवार राजीनामा द्या, महाराष्ट्राची माफी मागा'

गुरूवारी सकाळी लहान भाऊ पुजाराम पाबळे शेताकडे पाणी भरण्यास गेला असता बबन बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याने तात्काळ बिडकीन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय आधिका-यांनी तपासून मयत घोषित करून बिडकीन पोलीस ठाण्यास खबर दिल्यावरून हवालदार सोमनाथ तांगडे, श्री चव्हाण यांनी पंचनामा केला.वैद्यकीय आधिकारी डॉ. गोरे, डॉ. चौधरी यांनी शवविच्छेदन केले.

मराठवाड्याचं सौंदर्य; बीड, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळे

शवविच्छेदन अहवाल राखीव ठेवला असुन या घटनेची बिडकीन ठाण्यात आकस्मात नोंद होऊन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ तांगडे तपास करत आहे. मयत शेतक-यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

(edited by- pramod sarawale)